Buldhana News: बुलढाण्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी; सहा पदाधिकाऱ्यांचे ६ वर्षासाठी निलंबन

Buldhana BJP News: बुलढाण्यातील मेहकर तालुका अध्यक्षपदाच्या निवडीवरुन भाजपच्याच दोन गटात तुफान राडा झाला. या प्रकरणाची पक्ष श्रेष्ठींनी गंभीर दखल घेतली असून ६ पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
Buldhana News: Fight Between 2 BJP Groups in Buldhana At The Time Of Mehkar Taluka President Elections
Buldhana News: Fight Between 2 BJP Groups in Buldhana At The Time Of Mehkar Taluka President ElectionsBuldhana Batmya: Dispute Between 2 BJP Groups - Saam Tv
Published On

संजय जाधव, बुलढाणा| ता. ३ डिसेंबर २०२३

Buldhana Breaking News:

एकीकडे तीन राज्यांतील ऐतिहासिक विजयाचा जल्लोष सुरू असतानाच बुलढाण्यामध्ये भाजपच्या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे.  मेहकर तालुका अध्यक्ष निवडीवेळी हा संपूर्ण प्रकार घडला. या प्रकरणात आता सर्वात महत्वाची अपडेट समोर आली असून भाजप जिल्हाअध्यक्षांकडून सहा पदाधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, बुलढाण्यातील (Buldhana) मेहकर तालुका अध्यक्षपदाच्या निवडीवरुन भाजपच्याच दोन गटात तुफान राडा झाला. रविवार (३ डिसेंबरला हा संपूर्ण प्रकार घडला असून यावेळी भाजपा विधानसभा संपर्क प्रमुख श्री. प्रकाश गेवई यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. तसेच भाजप (BJP) कार्यालयाचीही तोडफोड करण्यात आली.

जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद लष्कर यांच्या गटाने नवनियुक्त तालुकाध्यक्ष सारंग माळेकर, विधानसभा संपर्क प्रमुख प्रकाश गवई, जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनराव वानखेडे भाजपा कार्यालयात उपस्थित असताना त्यांच्यावर हल्ला चढवला. या मारहाणीत चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Buldhana News: Fight Between 2 BJP Groups in Buldhana At The Time Of Mehkar Taluka President Elections
Chahat Pandey: अभिनयात पास पण राजकारणात नापास; 'आप'कडून निवडणूक लढवणाऱ्या अभिनेत्रीचा दारुण पराभव!

या प्रकाराची भाजपा पक्ष श्रेष्ठींनी गंभीर दखल घेतली असून ६ पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. शिव ठाकरे, प्रल्हाद अण्णा लष्कर, अक्षत दीक्षित, चंदन आडलेकर, रोहित सोळंके, विकास लष्कर यांचे भाजपातून ६ वर्षासाठी निलंबन करण्यात आले आहे. पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. बुलढाणा भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटें यांनी ही तडकाफडकी कारवाई केली आहे. (Latest Marathi News)

Buldhana News: Fight Between 2 BJP Groups in Buldhana At The Time Of Mehkar Taluka President Elections
Sanjay Raut on Assembly Election Result : छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा पराभव धक्कादायक, तेलंगणातील निकाल अनपेक्षित : संजय राऊत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com