SSC Exam Saam tv
महाराष्ट्र

SSC Exam : दहावीच्या पेपर दरम्यान परीक्षा केंद्रावर तरुणांचा धुडगूस; तीन जण पोलिसांच्या ताब्यात

Ahmednagar News : दहावीचे पेपर सुरु असताना शेवगाव तालुक्यातील बालंमटाकळी या परीक्षा केंद्रावर चल माझा फोटो काढ, बडबड नको करूस, तुला एका रपक्यात खाली बसवीन, असा एकेरी उल्लेख करत तरुणांनी घुडधूस वाला टोकाने शिक्षकांना दमबाजी केली होती.

Rajesh Sonwane

सुशील थोरात
अहमदनगर
: अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बालंमटाकळी येथे दहावीच्या परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रावर (Ahmednagar) आलेल्या टुकार पोरांनी महिला पर्यवेक्षिकेला दमबाजी केली. तसेच हातात काठ्या घेऊन दहा ते पंधरा जणांच्या टोळक्यांनी खुलेआम परीक्षा हॉलमध्ये धुडगूस घातला होता. (SSC Exam) विशेष हणजे या कृत्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या तीन जणांना अटक केली आहे. (Latest Marathi News)

दहावीचे पेपर सुरु असताना (Shevgaon) शेवगाव तालुक्यातील बालंमटाकळी या परीक्षा केंद्रावर चल माझा फोटो काढ, बडबड नको करूस, तुला एका रपक्यात खाली बसवीन, असा एकेरी उल्लेख करत तरुणांनी घुडधूस वाला टोकाने शिक्षकांना दमबाजी केली होती. बालमटाकळी येथील भगवान विद्यालयात उपकेंद्र आहे. मंगळवारी परीक्षा (Exam) सुरू असताना जवळपास १० ते १५ युवक खुलेआम परीक्षा हॉलमध्ये घुसून विद्यार्थ्यांना कॉपी पुरवत होते. तर काही युवक हातात काठ्या घेऊन फिरत होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

तिघांना अटक 
सदर प्रकारचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी परीक्षा केंद्र संचालक यांच्या तक्रारीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणणे, महिला शिक्षकांना दमदाटी करणे, परीक्षा केंद्रात गडबड गोंधळ करणे; या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. शेवगाव (Police) पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी या गुन्ह्यातील आरोपींना अटक केली आहे. ज्ञानेश्वर जनार्धन रक्टे, दिपक अंकुश सपकाळ,अभिषेक भगवान गरड या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Budhaditya Rajyog: बुध ग्रहाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळणार

SCROLL FOR NEXT