Nashik Rain News : नाशिकमध्ये अनेक जिल्ह्यांत बरसल्या पावसाच्या सरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

Nashik Unseasonal Rain News : लासलगाव तसेच चांदवड तालुक्यातील सोनी सांगवी, विटावे, सळसाने,पाटे, कोलटेक परिसरात बेमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी बरसल्या आहेत.
Nashik Rain News
Nashik Rain NewsSaam TV

Nashik News :

राज्यात अनेक जिल्ह्यांत उन्हाचा कहर झाला आहे. अशात नाशिक जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वतावरणासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मालेगाव शहरात व परिसरात अवकाळी पावसाने हजेरी देखील लावली आहे.

Nashik Rain News
Nashik Lok Sabha: मोठी बातमी! छगन भुजबळ लोकसभेची निवडणूक लढवणार? महायुतीच्या जागावाटपात नवा ट्विस्ट

मालेगावचा पारा काल 42 अंशावर होता मात्र. सकाळी ढगाळ वातावरण तयार होऊन अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे बळीराजा मात्र धास्तावला आहे. तर उकाड्यापासून त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

लासलगाव तसेच चांदवड तालुक्यातील सोनी सांगवी, विटावे, सळसाने,पाटे, कोलटेक परिसरात बेमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी बरसल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावरून देखील पाणी वाहू लागले आहे. तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला आहे.

फीड एफटीपी केलय

मनमाड शहर परिसरात देखील सकाळपासूनच ढगाळ वातावरण तयार झालेय. तसेच आकाशात काळे ढगही दाटून आलेय. त्यामुळे वातावरणातील तापमानात काहीशी घट झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मनमाड व परिसरातीलील तापमानाचा पारा ३८ ते ३९ अंशावर गेला होता. मात्र अचानक वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण तयार झाले असून अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. एकीकडे तापमानात घट झाली असली तरी दुसरीकडे मात्र ढगाळ वातारणाने उषम्यात वाढ झाली आहे.

धुळ्यात देखील अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाने अचानक हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडालीये. अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे नुकसान होण्याची भीती आहे. अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय.

नागपूरात तापमाचा पारा वाढल्याने मार्च अखेरपासूनच उन्हाचे चटके जाणवू लागले

एकीकडे अवकाळी पावसाच्या सरी बरसत आहेत. तर दुसरीकडे नागपूर शहरामध्ये दुपारच्या उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. त्यामुळे क्रीडा स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करूनये अशा सूचना नागपूर मनपाकडून देण्यात आल्यात. नागपूर महानगरपालिकेच्या क्रीडा आमी सांस्कृतिक विभागामार्फत क्रीडा सांस्कृतिक संघटना आणि शाळा, महाविद्यालयांना सूचना देण्यात आल्यात. तसेच नागरिकांनी उष्माघात प्रतिबंधक उपाय करत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Nashik Rain News
Unseasonal Rain: अवकाळी पाऊस, गारपिटीचा फटका; यवतमाळमधील 7 तालुक्यात शेती, फळबागांचे नुकसान, वाशीममध्ये बीजवाई कांदा उत्पादक आर्थिक संकटात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com