Nashik Lok Sabha: मोठी बातमी! छगन भुजबळ लोकसभेची निवडणूक लढवणार? महायुतीच्या जागावाटपात नवा ट्विस्ट

Nashik Lok Sabha Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत.
Chhagan Bhujbal Latest News
Chhagan Bhujbal Latest NewsSaam tv

अभिजित सोनवणे, साम टीव्ही नाशिक

Chhagan Bhujbal Latest News

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊन आठवडाभराचा कालावधी लोटला. मात्र, तरी देखील महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. भाजपने जरी काही जागांवरील उमेदवार जाहीर केले असले, तरी काही जागांवरचा तिढा अद्याप कायम आहे. अशातच महायुतीच्या जागा वाटपात नवा ट्विस्ट आलाय. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Chhagan Bhujbal Latest News
Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार? ईडीच्या अटकेविरोधात आज दिल्ली हायकोर्टात सुनावणी

नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांची उमेदवारी निश्चित असल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे. छगन भुजबळ यांच्या उमेदवारीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला छगन भुजबळांसह नाशिक लोकसभेतील अजित पवार गटाचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत. (Lok Sabha Election 2024)

सकाळी ८ वाजता छगन भुजबळ नाशिक येथील फार्मवरून पदाधिकाऱ्यांसह पुण्याला रवाना होणार आहे. नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीच्या नेत्यांमध्ये आधीच धुसफूस सुरू आहे. शिंदे गटाकडे असलेली ही जागा यंदाच्या निवडणुकीत भाजपला सोडावी, अशी मागणी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली आहे. (Latest Marathi News)

दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र, खासदार श्रीकांत शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी नाशिक लोकसभेतून हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी मिळणार अशी घोषणा केली होती. यावरून भाजप आणि शिंदे गटात चांगलीच खडाजंगी देखील झाली. अशातच, या जागेसाठी अचानक छगन भुजबळ यांचे नाव समोर आले आहे.

मंगळवारपासून छगन भुजबळ यांचे व्हिडिओ नाशिकच्या सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. त्यामुळे महायुतीतील जागावाटपाचा तिढा आणखीच वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, “माझं नाव कार्यकर्त्यांनी चर्चेत आणले. पण याबाबत तिन्ही पक्षाचे नेते मिळून निर्णय घेतील. काय रुसवे आहे, नाराजी आहे याबत गोषवारा घेतील, अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

Chhagan Bhujbal Latest News
Lok Sabha Election 2024: भाजपच्या उमेदवारांची सहावी यादी जाहीर, कोणाला कुठून मिळाली संधी? जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com