Shrirampur News Saam tv
महाराष्ट्र

Shrirampur News : श्रीरामपूरमध्ये आज कडकडीत बंद; जिल्हा करावा करण्याच्या मागणीसाठी बंद

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

श्रीरामपूर (अहमदनगर) : अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा करावा; या मागणीसाठी आज श्रीरामपूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. शहरात पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि व्यापारी सहभागी झाले आहेत. यामुळे आज सकाळपासूनच मार्केटमध्ये शुकशुकाट पाहण्यास मिळत आहे. 

राज्यात क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेल्या अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्याचे विभाजन करावे. तसेच श्रीरामपूर हा नवीन जिल्हा करावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून येथील शहरवासीयांची आहे. त्यासाठी शेकडो आंदोलन देखील आजवर करण्यात आली आहेत. या दरम्यान जिल्हा नामांतराची घोषणा झाली आहे. मात्र जिल्हा विभाजनाचा प्रश्न अजूनही शासन दरबारी खितपत पडला आहे. यामुळे आता पुन्हा एकदा श्रीरामपूर (Shrirampur) जिल्हा व्हावा हि मागणी जोर धरताना दिसत आहे. 

याच मागणीसाठी आज जिल्हा कृती समीतीने शहर बंदची हाक देण्यात आली होती. शहरात पुकारलेल्या बंदला शहरातील व्यापाऱ्यांनी देखील शंभर टक्के प्रतिसाद देत आपले व्यवहार बंद ठेवले आहेत. परिणामी सकाळपासून एक देखील दुकान अद्याप उघडण्यात आलेले नाही. या आंदोलनात सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Visarjan 2024 LIVE : पुण्यातील मानाच्या सर्व गणपतींचे विसर्जन

Maharashtra News Live Updates: वडगाव शेरी मतदारसंघाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे याचा शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

Nashik Tourist Places : अविस्मरणीय क्षणांचा अनुभव घ्यायचाय? नाशिकच्या 'या' ५ प्रेक्षणीय स्थळांना द्या भेट

Womens T20 World Cup 2024 : टी२० वर्ल्डकपचं वेळापत्रक अचानक बदललं, आता IND W Vs PAK W कधी भिडणार? जाणून घ्या

Samsung Galaxy F05: वा! एक नंबर; दूरवरचा फोटोही येईल खास; स्वस्तातील स्टायलिश मोबाईल फोन लॉन्च

SCROLL FOR NEXT