Ahmednagar Politics Breaking News Saamtv
महाराष्ट्र

Rohit Pawar News: रोहित पवारांना बालेकिल्ल्यात धक्का! कट्टर समर्थकाने सोडली साथ; अजित पवार गटात प्रवेश

Ahmednagar Politics Breaking News: कर्जत जामखेड विधानसभेचे आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. रोहित पवार यांचे कट्टर समर्थक आणि अहिल्यादेवींचे वंशज अक्षय शिंदे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला.

Gangappa Pujari

सुशिल थोरात, अहमदनगर|ता. ४ मे २०२४

राज्यात सर्वत्र लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राज्यभरात प्रचार सभांचा, रॅलींचा धडाका सुरू आहे. अशातच कर्जत जामखेड विधानसभेचे आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. रोहित पवार यांचे कट्टर समर्थक आणि अहिल्यादेवींचे वंशज अक्षय शिंदे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला.

याबाबत सविस्तर माहिती अशी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे लोकसभेच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. राज्यभर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रचारार्थ रोहित पवार यांच्या सभांचा धडाका सुरू आहे. अशातच रोहित पवार यांना कर्जत जामखेडमध्ये मोठा धक्का बसला आहे.

रोहित पवार यांचे कट्टर समर्थक आणि अहिल्यादेवींचे वंशज अक्षय शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुंबईमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. अक्षय शिंदे सुरुवातीपासूनच रोहित पवार यांच्याबरोबर सक्रिय राजकारणात कार्यरत होते. मात्र काही दिवसांपासून रोहित पवार आणि अक्षय शिंदे यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता. त्यानंतर आता त्यांनी अजित दादांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.

बारामतीत आज सभांचा धडाका..

दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ शरद पवार, बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, यांची दौंड तालुक्यातील वरवंड येथे आज दुपारी दोन वाजता जाहीर सभा होणार आहे. तर महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती तालुक्यात चार सभा होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Bigg Boss 19'च्या सदस्याने नॅशनल TVवर दिली प्रेमाची कबुली; गुडघ्यावर बसून केला प्रपोज, पाहा रोमँटिक VIDEO

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! ठाण्यावरून थेट गेट वे ऑफ इंडियाला जा, तयार होतोय नवा भुयारी मेट्रो मार्ग; सर्वाधिक फायदा कुणाला?

Maharashtra Live News Update: लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल

Jio Recharge Plan: कमी खर्चात जास्त सुविधा! जिओचा 70 दिवसांचा धमाकेदार रिचार्ज प्लॅन, वाचा फायदे

Bhoplyachi Bhaji Recipe : गरमागरम वडे अन् भोपळ्याच्या भाजी, संडे स्पेशल चटपटीत बेत

SCROLL FOR NEXT