Onion Price Hike: शेतकऱ्यांना अच्छे दिन! निर्यातबंदी उठताच कांद्याचे भाव वधारले; प्रतिक्विंटल मिळतोय इतका दर

Onion Price News Today: निर्यातबंदी उठताच कांद्याचे भाव तब्बल ५०० रुपयांनी वधारले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
Onion Price News Today
Onion Price News TodaySaam TV
Published On

Onion Export News Today

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय घेतला. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. निर्यातबंदी उठताच कांद्याचे भाव तब्बल ५०० रुपयांनी वधारले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी कांद्याला चांगला भाव मिळत आहे. निर्यातबंदी हटवल्याने कांद्याचे भाव प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वधारले आहेत.

Onion Price News Today
Onion Export News: मोठी बातमी! कांद्यावरील निर्यात बंदी हटवली; निवडणुकीच्या धामधुमीत केंद्राचा मोठा निर्णय

 केंद्र सरकारने (Central Government) घेतलेला निर्णय योग्य असून शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. परंतु हा निर्णय आधी घेतला असता, तर शेतकऱ्यांना यापेक्षाही अधिक फायदा झाला असता, असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांनी यापूर्वीच आपला माल विकून टाकलेला असून आता बाजारात येणारा कांदा अल्प प्रमाणात राहणार आहे.

सध्या स्टॉक करण्याचं सीजन असल्यामुळे काही व्यापारी आणि शेतकरी कांद्याचा स्टॉक करू शकतात. त्यामुळे येत्या काही दिवसांत कांद्याला आणखीच चांगला भाव मिळू शकतो, असंही कांदा व्यापाऱ्याने सांगितलं आहे.

दुसरीकडे कांदा उत्पादक (Onion Price) शेतकऱ्यांनी देखील सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. कांद्याचे भाव आणखीच वाढले, तर शेतकरी स्टॉक केलेला कांदा बाजारात आणतील. त्यामुळे मागच्या वेळी कवडीमोल दराने मिळालेल्या भावाची यात थोडीफार कसर भरून निघेल, असं कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी (Onion Export Ban) लागू केलेली होती. याचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत होता. कांद्याचे भाव झपाट्याने खाली आल्याने शेतकरी अडचणीत सापडला होता.

त्यामुळे केंद्र सरकारविरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. आता केंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी हटवून १ मॅट्रिक टन कांद्यासाठी ५५० डॉलर्स निर्यात मूल्य निश्चित केलं आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून आगामी काळात कांद्याला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे.

Edited by - Satish Daud-Patil

Onion Price News Today
Sharad Pawar on Narendra Modi: मोदींनी तरी कुठे कुटुंब सांभाळलं; 'त्या' टीकेला शरद पवारांचं सडेतोड उत्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com