Central Government Permitted Onion Export
Central Government Permitted Onion Export Yandex

Onion Export News: मोठी बातमी! कांद्यावरील निर्यात बंदी हटवली; निवडणुकीच्या धामधुमीत केंद्राचा मोठा निर्णय

Onion Export News Today: लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. कांद्यावरील निर्यातबंदी हटवण्यात आली आहे.

Onion Export Ban News Today

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. कांद्यावरील निर्यातबंदी हटवण्यात आली आहे. त्याचबरोबर १ मॅट्रिक टन कांद्यासाठी जवळास ५५० डॉलर्स निर्यात मूल्य निश्चित करण्यात आलं आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Central Government Permitted Onion Export
Buldhana Water Crisis: बुलढाणा जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा... ४६ गावांमध्ये ४७ टँकर सुरू; पाण्यासाठी नागरिकांची वणवण

गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी (Onion Export Ban) लागू केलेली होती. याचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत होता. कांद्याचे भाव झपाट्याने खाली आल्याने शेतकरी अडचणीत सापडला होता. त्यामुळे केंद्र सरकारविरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता.

याच मुद्द्यावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील केंद्र सरकारवर (Central Government) जोरदार टीकास्त सोडलं होतं. मोदी सरकारला शेतकऱ्यांची अजिबात चिंता नसून हे फक्त व्यापाऱ्यांच्या हिताचं सरकार होतं, असं म्हणत विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं.

दरम्यान, राज्यात सध्या लोकसभेची निवडणूक सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या या रोषाचा फटका भाजपला बसणार, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. हीच बाब लक्षात घेता केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी हटवण्याचा निर्णय घेतला आहे. १ मॅट्रिक टन कांद्यासाठी ५५० डॉलर्स निर्यात मूल्य निश्चित करण्यात आलं आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, अगदी आठवड्याभरापूर्वी गुजरातमधील २ हजार टन पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीस केंद्र सरकारने परवानगी दिली होती. यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी चांगलेच आक्रमक झाले होते.

दरम्यान, कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय ही शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक करणारा आहे. निर्यात बंदी उठली असे वाटत असले, तरी निर्यात शुल्क तसेच त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार नाही, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी म्हटलं आहे.

Central Government Permitted Onion Export
Nagpur Earthquake : नागपूर शहरात भूकंपाचे सौम्य धक्के, रिश्टर स्केलवर २.५ इतकी तीव्रता; नागरिकांमध्ये घबराट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com