Ahmednagar Breaking News Saamtv
महाराष्ट्र

Ahmednagar News: दूध आणि ऊस दरासाठी रास्ता रोको; नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नेवासा- श्रीरामपूर महामार्ग अडवला

Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar) शेतकरी दूध दराच्या वाढीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी दूध दरात घट झाल्याच्या निषेधार्थ आंदोलने सुरू आहेत.

Gangappa Pujari

सचिन बनसोडे, अहमदनगर, ता. २९ नोव्हेंबर २०२३

Amhednagar Breaking News:

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून दुधाचे दर दूध संघाने पाडले आहेत. गाईच्या दुधाला किमान ३४ रुपये लिटर दर दिला पाहिजे हा सरकारचा अध्यादेश सर्व दूध संघांनी धुडकावून लावला आहे. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात दूध आणि ऊस दरावरुन ठिकठिकाणी आंदोलने पाहायला मिळत आहेत. आज शेतकर्‍यांनी नेवासा - श्रीरामपूर महामार्ग अडवत आंदोलन केले.

अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar) शेतकरी दूध दराच्या वाढीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी दुध दरात घट झाल्याच्या निषेधार्थ आंदोलने सुरू आहेत. दूध दरामध्ये तब्बल १० रुपयांची घट झाली आहे. म्हशीच्या दुधाचा दर ५६ रुपयांवरून ४६ रुपये तर गाईच्या दुधाचा भाव ३८ वरून २८ रुपये झाला आहे.

सध्या दुष्काळ असल्याने दुधाचे उत्पादन घटले असल्याने मागणी पुरवठ्याचे गणित पाहता दूध दर वाढायला पाहिजे होते. याऊलट दूध दरात कमी झाल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे शेतकऱ्यांनी ऊसदर वाढ तसेच दूध दरवाढीसाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले.

  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ऊसाला 3500 रूपये दर जाहीर करावा तर दुधाला किमान 40 रूपये दर द्यावा अशी मागणी करत आंदोलकांनी हरेगावफाटा येथे नेवासा श्रीरामपूर महामार्ग अडवत रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे न्याय मिळत नसेल तर गुंडगिरी करू, ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Garja Maharashtra Maza : ठाकरेंच्या मेळाव्याची गर्जा महाराष्ट्र गीताने सुरूवात | VIDEO

Rava Puri Recipe : टिफीनमध्ये रोज चपाती कशाला? झटपट करा कुरकुरीत बटाटा पुरीचा नाश्ता

विजयी मेळाव्याला या मराठी कलाकारांची हजेरी, Photo पाहा

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

SCROLL FOR NEXT