Datta Dalvi: साधा शिवसैनिक ते मुंबईचे महापौर; मुख्यमंत्री शिंदेंना शिवीगाळ करणारे दत्ता दळवी आहेत तरी कोण?

Who is Datta Dalvi: मुख्यमंत्री शिंदेंना चॅलेंज करणारे दत्ता दळवी आहेत तरी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
Who is Datta Dalvi
Who is Datta DalviSaam TV
Published On

Who is Shivsena Datta Dalvi

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांना मुंबई पोलिसांनी राहत्या घरातून अटक केली. त्यांना कोर्टात हजर केलं असता, 12 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दत्ता दळवी यांना अटक होताच शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंना चॅलेंज करणारे दत्ता दळवी आहेत तरी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. इतकंच नाही, तर दळवी यांनी शिंदेवर टीका करण्याचे कारण का? असाही प्रश्नही अनेकजण विचारत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Who is Datta Dalvi
Unseasonal Rain: राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळीचा तडाखा; लाखो हेक्टरवरील पिकांची माती, बळीराजा संकटात

कोण आहेत दत्ता दळवी?

शिवसेनेचे (Shivsena) धाडसी आणि आक्रमक नेते म्हणून दत्ता दळवी यांची ओळख आहे. साधा शिवसैनिक ते मुंबईचे महापौर असा दळवी यांचा प्रवास राहिला आहे. ईशान्य मुंबईत दळवी यांची मोठी ताकद आहे. त्यांनी शिवसेनेचे विभागप्रमुख म्हणून देखील काम पाहिले आहे.

आपल्या विकासकामांची शैली आणि आक्रमकतेमुळे दत्ता दळवी २००५ ते २००७ या कालावधीत मुंबईचे (Mumbai) महापौर होते. महापौर म्हणूनही त्यांची कारकिर्द चांगलीच गाजली होती. २०१८ साली शिवसेनेच्या ईशान्य मुंबईत महिला पदाधिकाऱ्यांनी गटबाजी केली होती. त्यावेळी देखील दत्ता दळवी चर्चेत आले होते.

या गटबाजीवरून दळवी यांनी शिवसेना विभागप्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच दळवी यांचा राजीनामा घेतला होता, असं बोललं जातं. ठाकरे घराण्यासोबत एकनिष्ठ असलेल्या शिवसैनिकांमध्ये दळवी यांचं नाव घेतलं जातं.

दत्ता दळवी यांचं नाव एप्रिल २०२२ मध्येही चर्चेत आलं होतं. त्यावेळी मालवण तालुक्यातील एका गावात अनधिकृतपणे बैलाच्या झुंजीचे आयोजन करण्यात आले होते. या झुंजीत एका बैलाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी दळवी यांच्यासह १२ जणांवर गुन्हा देखील दाखल केला होता. आता मुख्यमंत्री शिंदे यांना भरसभेत शिवीगाळ केल्याप्रकरणी दळवी यांना १२ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Who is Datta Dalvi
Sanjay Raut News : 'धर्मवीर' सिनेमाचे निर्माते, कलाकारांवर कारवाई करणार का? दत्ता दळवी यांच्या अटकेवर संजय राऊत यांचा संतप्त सवाल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com