Shrirampur Bribe Case Saam tv
महाराष्ट्र

Shrirampur Bribe Case : १२ हजारांची लाच घेतांना पोलीस हेडकॉन्स्टेबल ताब्यात; गुन्ह्यात नाव येऊ न देण्यासाठी मागितली लाच

Ahmednagar News : श्रीरामपूर तहसील कार्यालयाकडून अवैध मुरूम वाहतूक करत असताना डंपर पकडण्यात आले होते. हे डंपर तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले होते

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

श्रीरामपुर (अहमदनगर) : अवैध मुरूम वाहतूक करणारा डम्पर पकडण्यात आला असता त्याची तहसील कार्यालयातून चोरी झाली होती. या प्रकरणी गुन्ह्यात नाव येऊ न देण्यासाठी २० हजाराची लाचेची मागणी करण्यात आली होती. यात १२ हजाराची रक्कम स्वीकारताना पोलीस  हेडकॉन्स्टेबल रघुनाथ खेडकर यांना रंगेहाथ पकडण्यात आले. 

रेती व मुरूम वाहतूक (Ahmednagar) करण्यास मनाई आहे. मात्र छुप्या पद्धतीने अवैधपणे वाहतूक सुरूच आहे. अशांवर पोलीस प्रशासन व महसूल विभागाकडून कारवाई करण्यात येत असते. अशाच प्रकारे (Shrirampur) श्रीरामपूर तहसील कार्यालयाकडून अवैध मुरूम वाहतूक करत असताना डंपर पकडण्यात आले होते. हे डंपर तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले होते. मात्र हे डंपर चोरी गेल्याचा प्रकार घडला होता. दरम्यान या प्रकरणातील गुन्ह्यात नाव न येऊ देण्यासाठी पोलीस हेडकॉन्स्टेबल रघुनाथ खेडकर यांनी २० हजाराची मागणी केली होती. 

दरम्यान तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार एसीबीने (ACB) सापळा रचला होता. मात्र खेडकर यांच्या सांगण्यावरून चहावाल्याने १२ हजार रुपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारली. याचवेळी एसीबीने चहावाल्याला ताब्यात घेतले. यानंतर सदरची रक्कम खेडकर यांच्या सांगण्यावरून स्वीकारल्याची माहिती समोर आली. त्यानुसार (Bribe) खेडकर आणि खाजगी इसम श्रीवास्तव यांचे विरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Oldest fort in India: भारतातील सर्वात जुना किल्ला कोणता आहे?

Maharashtra Live News Update: मनोज जरांगेंचे बॅनर अज्ञात व्यक्तीने फाडले

Mukesh Ambani : अंबानींच्या घरी रोज बनवल्या जातात तब्बल ४००० चपात्या! वाचून व्हाल थक्क

Priya Marathe: प्रिया मराठेचे 'तू तिथे मी' मालिकेतील फोटो पाहिलेत का?

जीएसटीत मोठा बदल! बाईक आणि स्कूटर खरेदीदारांसाठी खुशखबर; दुचाकी स्वस्त होणार?

SCROLL FOR NEXT