ATM Crime : बोलण्यात गुंतवून हातचलाखीने एटीएम कार्ड बदलले; फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक

Bhiwandi News : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या इसमांना बोलण्यात गुंतवून हातचलाखीने एटीएम कार्ड बदली करून तसेच पैसे काढणारे इसमाचे पिन नंबर पाहून एटीएममधून पैसे काढून फसवणूक केले
ATM Crime
ATM CrimeSaam tv

फय्याज शेख 

भिवंडी : एटीएम मशीनमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला बोलण्यात गुंतवून हातचलाखीने एटीएम कार्ड बदलवून घेत पैसे काढले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर भिवंडीतील सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे.  

ATM Crime
Navapur News : नवापूर तालुक्यात कडकडीत बंद; आदिवासी महिलेवर सामूहिक अत्याचार प्रकरणी जलद कारवाईची मागणी

एटीएम मशीनमध्ये (ATM Crime) झालेल्या प्रकाराबद्दल पोलिसांनी तपास सुरु केला. भिवंडी गुन्हे शाखा घटक २ शहरामध्ये समांतर तपास करीत असताना सीसीटीव्हीच्या फुटेजवरून तसेच मिळालेल्या गोपनीय माहिती आधारे संशयित आरोपी विकी राजू वानखेडे याला उल्हासनगर (Ulhasnagar) येथे राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. 

ATM Crime
Majalgaon News : चढ्या भावाने कपाशी बियाणांची विक्री; माजलगावमध्ये दुकानदारावर गुन्हा दाखल

सदर आरोपीस विश्वास घेऊन अधिक तपास केला असता त्याने एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या इसमांना बोलण्यात गुंतवून हातचलाखीने एटीएम कार्ड बदली करून तसेच पैसे काढणारे इसमाचे पिन नंबर पाहून एटीएममधून पैसे काढून फसवणूक केले. त्याने (Bhiwandi) भिवंडी, दिवा, चेंबूर, मुंबई या भागात गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्याकडून वेगवेगळ्या बँकेचे एटीएम कार्ड हस्तगत करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com