Majalgaon News : चढ्या भावाने कपाशी बियाणांची विक्री; माजलगावमध्ये दुकानदारावर गुन्हा दाखल

Beed News : बीडमध्ये कृषी विभाग ऍक्शन मोडमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. बीडच्या माजलगाव शहरामध्ये कपाशी बियाणांची कृत्रिम टंचाई करून चढ्या भावाने विक्री केली जात असल्याचा प्रकार समोर आला
Majalgaon News
Majalgaon NewsSaam tv

बीड : खरीप हंगामाच्या अनुषंगाने बियाणे विक्रेत्यांकडून जादा दराने बियाणे विक्री करण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. कृषी विभागाने याबाबत कारवाईचे संकेत दिले असताना देखील छुप्या पद्धतीने चढ्या भावाने बियाणे विक्री सुरूच आहे. अशाच प्रकारे माजलगाव येथे चढ्या दराने बियाणे विक्री करणाऱ्या दुकानदारावर कृषी विभागाने गुन्हा दाखल केला आहे.  

Majalgaon News
Water Scarcity : राज्यातील पाणीसाठा २२ टक्क्यांवर; पुणेकरांचीही चिंता वाढली, खडकवासला धरणात ५ टीएमसी पाणी

बीडमध्ये (Beed) कृषी विभाग ऍक्शन मोडमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. बीडच्या माजलगाव शहरामध्ये कपाशी बियाणांची कृत्रिम टंचाई करून चढ्या भावाने विक्री केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या दुकानदाराला कृषी विभागाने चांगलाच दणका दिला. कपाशीची कब्बडी वाणाची ८६४ रुपयांची बॅग तब्बल ११०० रुपयांना व राशी आरसीएच - ७७९ ही बॅग देखील चढ्या भावाने विक्री केल्याचं समोर आलं होते. यावर कृषी विभागाने ऍक्शन घेतली आहे. 

Majalgaon News
Navapur News : नवापूर तालुक्यात कडकडीत बंद; आदिवासी महिलेवर सामूहिक अत्याचार प्रकरणी जलद कारवाईची मागणी

आता या प्रकरणी महावीर ऍग्रो एजन्सीचे संचालक मोहित मिठ्ठलाल तातेड याच्यावर कृषी अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून बीडच्या माजलगाव शहर पोलीस (Police) ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हा गुन्हा यंदाच्या हंगामातील पहिला गुन्हा असून कृषी विभाग आता ऍक्शन मोडमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com