Ahmednagar News Saam TV
महाराष्ट्र

Ahmednagar News: ऐन दिवाळीत पाणीप्रश्न पेटणार; शिंदे गटाच्या खासदारांचा जायकवाडीला पाणी सोडण्यास विरोध

Ahmednagar: जवळपास साडेआठ टिएमसी पाणी सोडण्यात येणार असल्याने नगर नाशिकमधील शेतकरी संकटात सापडणार आहेत.

साम टिव्ही ब्युरो

सचिन बनसोडे

Ahmednagar News:

अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयावर नेत्यांसह शेतकरी आक्रमक झाले आहेत. पाणी जर सोडले तर नगर नाशिकमधील शेतकरी उध्वस्त होणार असल्याचे शिंदे गटाचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी म्हटले असून पाणी सोडण्यास विरोध केलाय.

समन्यायी पाणी वाटप कायद्याचा आधार घेत नगर -नाशिकमधील धरणांतून मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा आदेश देण्यात आलाय. जवळपास साडेआठ टिएमसी पाणी सोडण्यात येणार असल्याने नगर नाशिकमधील शेतकरी संकटात सापडणार आहेत.

एकीकडे निळवंडे धरणातून दुष्काळग्रस्त भागात सोडलेले पाणी अनेक गावात पोहचलेच नाही. त्यामुळे संतप्त झालेले शेतकरी जायकवाडीला पाणी सोडणार असल्याने हवालदिल झाले आहेत. आज खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिर्डीत बैठक घेतली आणि पाणी सोडण्याच्या निर्णयाला विरोध केलाय.

2005 साली झालेला काळा कायदा आज नगर नाशिकवर अन्याय करणारा असून इथल्या सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येवून यासाठी लढा देण्याची गरज असल्याचं खासदार सदाशिव लोखंडे यांनी म्हणटलंय. हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवायचा असेल तर पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी गोदावरी खोर्‍यात वळवण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हणटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : या राशींच्या व्यक्तींना नागदेवता पावणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय

Kolhapur Superstition : अंधश्रद्धेचा कहर! बाहुली, नारळ, लिंबू अन् एक चिठ्ठी; कोल्हापुरात घटस्फोटासाठी अघोरी प्रकार

Ashok Sharaf: सलमान खानने अशोक सराफ यांचा गळाच कापला; ३३ वर्षानंतर मामांनी सांगितला शुटिंगचा थरारक किस्सा

Micro Walking: मायक्रो वाकिंग म्हणजे काय? यामुळे कोणते फायदे होतात

SCROLL FOR NEXT