Ashadhi Wari 2023 Saam tv
महाराष्ट्र

Ashadhi Wari 2023: वारीत दिसला जातीय सलोखा; मुस्लिम तरुणांनी दिला पालखीला खांदा

साम टिव्ही ब्युरो

सुशील थोरात

अहमदनगर : गेल्या काही महिन्यांपासून हिंदू- मुस्लिम समाजात तेढ पसरल्‍याचे वातावरण पहावयास मिळत आहे. यात दिवसेंदिवस ही कट्टरता वाढत चाललेली आहे. सोशल मीडियाने तर ह्यात भरच टाकली आहे. मात्र काही लोक एकमेकांच्या आनंदात दुःखात सहभागी होऊन माणुसकी हाच मोठा धर्म आहे. ह्याचे पालन करताना दिसतात. याचे उत्‍तम उदाहरण (Ashadhi Wari) आषाढी वारतील पालखीला मुस्लिम बांधवांनी दिलेल्‍या खांद्यातून दिसून येते. (Live Marathi News)

गेल्या काही दिवसांपूर्वी शेवगाव येथे दोन समाजात तेढ निर्माण होऊन जातीय दंगल उसळली होती. त्यामुळे शेवगाव (Shevgaon) तालुक्यात या दंगलीनंतर मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झालं होतं. मात्र या घटनेला महिना होत नाही तोच एक सामाजिक सलगत दर्शन शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे घडले आहे. पैठणचे शांतीब्रम्ह एकनाथ महाराज यांचा आषाढी वारी पालखी सोहळा बोधेगाव येथून निरोप घेऊन (Pandharpur) पंढरीकडे मार्गस्थ होत असताना बोधेगावमधील मुस्लिम तरुणांनी शांतिब्रह्म एकनाथ महाराज यांच्या पालखीला खांदा देत जातीय सलोखाच एक वेगळे उदाहरण समाजासमोर मांडला आहे.

एकीकडे शेवगाव तालुक्यात दंगलीमुळे वातावरण ढवळून निघाले असताना दुसरीकडे मुस्लिम बांधवांनी पालखीला खांदा देवून सामाजिक एकतेचा संदेश दिला. हीच शिकवण जगातील सर्वच लोकांनी आत्मसात केली आणि ह्या बांधवांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवला तर जगातील निम्मे प्रश्न अगदी सहज सुटतील; अशी भावना या पालखी सोहळ्यातून व्‍यक्‍त करण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

Kili Paul Dance : किली पॉलने भोजपुरी गाण्यावर धरला ठेका, 'लॉलीपाप लागेलू'वर जबरदस्त डान्स; हुकस्टेपने वेधलं लक्ष

Shahajibapu Patil : उद्धव ठाकरे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत; काळ्या दगडावरची पांढरी रेघ, ५० खोक्यांवरून शहाजीबापू खवळले

Mrunal Thakur: मृणाल ठाकूरविषयी माहित नसलेल्या गोष्टी

Navratri Special Dish: नवरात्रीसाठी रोज काय बनवायचं हा प्रश्न पडलाय का?

SCROLL FOR NEXT