Sambhajinagar News
Sambhajinagar NewsSaam tv

Sambhajinagar News: १ जुलैपासून मुंबईसाठी सायंकाळचे विमान

१ जुलैपासून मुंबईसाठी सायंकाळचे विमान
Published on

नवनीत तापडीया

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातून (Mumbai) मुंबईसाठी येथे १ जुलैपासून सायंकाळचे विमान सुरू करण्याची घोषणा इंडिगो एअरलाइन्सने केली आहे. त्याचे वेळापत्रकही (Sambhajinagar) जाहीर झाले आहे. यामुळे आता मुंबईसाठी सायंकाळी देखील विमान उपलब्ध होणार आहे. (Latest Marathi News)

Sambhajinagar News
Sangli News : साेनीत सहायक पोलिस उपनिरीक्षकाचा बुडून मृत्यू, पार्टीनंतर घडली दुर्देवी घटना

मुंबईसाठीचे सायंकाळचे विमान इंडिगो पुणे रद्द केल्यानंतर प्रवाशांची मोठी अडचण झाली होती. सकाळी मुंबईला गेल्यावर परत दुसऱ्या दिवशी यावे लागत होते. मात्र आता सायंकाळी इंडिगो पुणे विमान सुरू केल्याने प्रवाशांची सोय झाली. १ जुलैपासून सायंकाळची विमानसेवा सुरू होत असल्‍याने आता छत्रपती संभाजीनगरमधून मुंबईला एका दिवसात जावून येणे शक्‍य आहे.

Sambhajinagar News
Tulja Bhavani Mandir : पुजारी वैतागले; तुळजाभवानी मंदिरात उंदारांचा उच्छाद, पेढ्यांसह लाडवावर ताव

नऊ वाजता मुंबईला पोहचेल विमान

मुंबईहून सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी विमान निघून चिकलठाणा (Airport) विमानतळावर ७ वाजून २० मिनिटांनी लॅडिंग होईल. यानंतर तर परत हे विमान चिकलठाणाहून रात्री ७ वाजून ५० मिनिटांनी निघून रात्री ९ वाजता मुंबईला पोहोचेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com