Verification Of EVM And VVPAT Machine Saam Tv
महाराष्ट्र

Ahmednagar Politics : अहमदनगरच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, ४० मतदान केंद्रावरील VVPAT ची पडताळणी होणार, सुजय विखेंची मागणी मान्य

Verification Of EVM And VVPAT Machine: सुजय विखे पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी होणार आहे. त्यांनी ४० मतदान केंद्रावरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी करण्याची मागणी केली होती.

Priya More

सुशिल थोरात, अहमदनगर

अहमदनगर लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांची मागणी अखेर मान्य करण्यात आली आहे. सुजय विखे पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी होणार आहे. आक्षेप घेतलेल्या मतदान केंद्रावर मशीनची मेमरी रिकामी करून पुन्हा मतदान प्रक्रिया म्हणजेच मॉकपोल राबवली जाणार आहे.

डॉ. सुजय विखे पाटील यांनी ४ जूनला मतमोजणी पार पडल्यानंतर १० जून रोजी मतदारसंघातील ४० मतदान केंद्रावरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी करण्यासाठी जिल्हा निवडणूक विभागाकडे अर्ज केला होता. केंद्रीय निवडणूक आयोगाने आता जिल्हा निवडणूक विभागाला मॉकपोल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता या मतदान केंद्रावर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी केली जाणार आहे.

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा मतदान यंत्राची तपासणी करून मतमोजणी होणार आहे. ज्या ४० मतदान केंद्रावर सुजय विखे पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. त्या ठिकाणी व्हीव्हीपॅटची मोजणी होणार आहे. ही मोजणी आणि पडताळणी कशा पद्धतीने होणार आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

अशी केली जाणार मतदान यंत्राची पडताळणी -

- सुरुवातीला ईव्हीएम बनवलेल्या कंपनीचे अधिकारी मशीनची तांत्रिक तपासणी करतील.

- यानंतर आक्षेप घेतलेल्या ४० यंत्राची मेमरी रिकामी केली जाईल.

- यानंतर शेजारीच तयार केलेल्या मतमोजणी कक्षात पेपर स्लीप (व्हीव्हीपॅट) आणि ईव्हीएम मशीनवरील मतांची पडताळणी केली जाणार आहे.

- एका मशीनमध्ये प्रत्येकी १ ते १४०० मते टाकता येणार आहेत. किती मते करायचे हे ठरवण्याचे अधिकार उमेदवारांना आहेत.

- ही सर्व प्रक्रिया सीसीटीव्हीच्या निगरानीत पार पडणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लाडक्या बाप्पाला निरोप देताना लहान मुलांना अश्रू अनावर

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

SCROLL FOR NEXT