Ahmednager  Saam TV
महाराष्ट्र

Ahmednagar : चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नी आणि मुलींना जिवंत जाळलं; नगरमधील थरारक घटना

Ahmednagar Fire News : पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, या प्रकरणी आरोपी पतीला नगर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतलंय. गेल्या दिवसांपासून पती पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्याचा संशय दिवसेंदिवस वाढत चालला होता.

Ruchika Jadhav

Fire News :

नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथे एक खळबळजनक घटना घडली आहे. चारित्र्यावर संशय घेऊन नराधमाने पत्नीसह पोटच्या दोन मुलींना जिवंत जाळले आहे. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सुनील लांडगे असे आरोपीचे नाव आहे. तर लीलाबाई लांडगे मृत पत्नीचं नाव आहे. आईसह साक्षी लांडगे आणि खुशी लांडगे अशा दोन मुलींचाही आगीत होरपळून मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, या प्रकरणी आरोपी पतीला नगर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतलंय. गेल्या काही दिवसांपासून पती पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्याचा संशय दिवसेंदिवस वाढत चालला होता. यावरून दोघांमध्ये आतापर्यंत अनेकवेळा भांडणं झाली.

सोमवारी देखील दोघांमध्ये वाद झाला. हा वाद फार विकोपाला गेला. त्यामुळे रागाच्या भरात पतीने आपल्याच पत्नीची हत्या केली. इतकंच नाही तर नराधमाने पत्नीच्या आणि मुलींच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून त्यांना पेटवून दिले. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पाहाणी केली त्यावेळी दोन्ही मुली आणि आई तिघीही पूर्णत: जळून खाक झाल्या होत्या. तसेच घरातील अन्य सामान देखील जळाले होते. पोलिसांनी माय-लेकींना रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी सुनील लांडगेला ताब्यात घेतलं असून पुढील तपास नगर तालुका पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

E-Aadhaar App: ई-आधारवर सगळी कामे झटक्यात होणार, अ‍ॅप नेमकं आहे तरी काय? या दिवशी होणार लाँच

Manoj jarange patil protest live updates : अमित ठाकरेंचा आज पुणे दौरा, मानाच्या गणपतीचं घेणार दर्शन

Bullet Train : 508 किमी अंतर 3 तासांत, कोणत्या ठिकाणी थांबणार बुलेट ट्रेन? वाचा A टू Z माहिती

एअरपोर्टवर २ विमानांची टक्कर, क्षणात आगीचे लोट उठले, ९ जणांचा मृत्यू, VIDEO समोर

Pawan Singh Controversy: पत्नी ज्योतीने केलेल्या आरोपांवर पवन सिंहच्या वकिलाने दिली प्रतिक्रिया, काय म्हणाले? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT