Ahilyanagar News Saam Tv
महाराष्ट्र

Ahilyanagar News: ४ लाख रुपयांसाठी सासरच्या लोकांचा तगादा; छळाला कंटाळून २३ वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

Ahilyanagar Crime News: अहिल्यागरच्या राहता तालुक्यात धक्कादायक घटना आहे. सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने विहिरित उडी मारुन आत्महत्या केली आहे.

Siddhi Hande

अहिल्यानगरच्या राहाता येथे धक्कादायक घटना आहे. एका विवाहित महिलेने आत्महत्या केली आहे. सासरच्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून या महिलेने स्वतः जीव दिला आहे. सासरच्या लोकांनी हुंड्यासाठीय या महिलेचा छळ केला. या त्रासालाच कंटाळून तिने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.

हुंड्यासाठी २३ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

अहिल्यानगरच्या राहता तालुक्यातील एकरुखे येथे ही घटना घडला आहे. प्रिया शुभम ढगे असं या विवाहित महिलेचं नाव आहे. २३ वर्षीय विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून जीव दिला आहे.

विवाहित महिलेकडे माहेरुन हुंडा आणण्याची मागणी केली जात होती. सासरच्यांनी तिला पैसे आणायला सांगितले होते. घराच्या बांधकामासाठी चार लाख रुपयांची मागणी केली होती. पैसे न आणल्याने सासरच्यांकडून विवाहितेचा छळ करण्यात आला. याच जाचाला कंटाळून तिने आपलं आयुष्य संपवलं. पती शुभम ढगे, सासरा राजेंद्र ढगे आणि सासू प्रतिभा ढगे यांच्याविरोधात राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

२०२४ ते २०२६ या कालावधीत प्रियाच्या सासरच्यांनी तिला त्रास दिला. तिचा मानसिक अन् शारीरिक छळ सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. सासरच्यांचा छळ सहन न झाल्याने प्रियाने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT