Shrirampur Police Saam tv
महाराष्ट्र

Shrirampur Police : श्रीरामपूर पोलिसांची मोठी कारवाई; १३ कोटी ७५ लाख रुपयांचा ड्रग्स जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

Ahilyanagar News : राज्यात छुप्या पद्धतीने अमली पदार्थ तसेच ड्रग्सची तस्करी होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मुळात अमली पदार्थ वाहतूक व विक्री करण्यास बंदी असताना देखील चोरून याची तस्करी केली जात आहे

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

श्रीरामपूर (अहिल्यानगर) : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल १३ कोटी ७५ लाख रुपये किमतीचा ड्रग्सचा साठा जप्त केला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्सची तस्करी होत असताना पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस सखोल तपास करत आहेत.

राज्यात छुप्या पद्धतीने अमली पदार्थ तसेच ड्रग्सची तस्करी होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मुळात अमली पदार्थ वाहतूक व विक्री करण्यास बंदी असताना देखील चोरून याची तस्करी केली जात आहे. अशाच प्रकारे वाहतूक केली जात असताना श्रीरामपूर पोलिसांनी खंडाळा- दिघी रस्त्यावर रात्रीच्या सुमारास कारवाई केली आहे. यात मोठ्या प्रमाणात ड्रग्स आढळून आले आहे. 

दरम्यान श्रीरामपूर तालुक्यातील एमआयडीसी परिसरातील खंडाळा- दिघी रस्त्यावरून ड्रग्सची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे यांना मिळाली होती. त्यानुसार शिवपुजे यांच्या पथकाने सापळा रचत ड्रग्सची वाहतूक करणारा एक टॅम्पो अडवला. या वाहनातून अन्न आणि औषध प्रशासनाकडून प्रतिबंधित असलेला अल्प्राझोलम नामक पदार्थाच्या २१ गोण्या जप्त केल्या. 

दोघांवर गुन्हा दाखल, एकजण ताब्यात 

रात्रीच्या वेळी करण्यात आलेल्या कारवाईत ७० किलो वजनाचा तब्बल १३ कोटी ७५ लाख रुपये किमतीचा ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आला आहे. तर श्रीरामपूर पोलिस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला ताब्यात घेण्यात आले. श्रीरामपूर तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात मोठे ड्रग्स रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता असून पोलिस त्या दृष्टीने अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आंदोलन; वाढत्या प्रदूषणास कारणीभूत व्यवस्थेचा विरोध करण्यासाठी आंदोलन

Malad Tourism: गुलाबी थंडी अगदी जवळच फिरायला जायचंय? मग मालाडमधील या जागा ठरतील बेस्ट ऑप्शन

Secret Santa Gifts : लाडक्या मित्रांसाठी 'सिक्रेट सांता' गिफ्ट्स, 500 रुपयांच्या आता युनिक भेटवस्तू

Pune News: पुण्यातील आदिवासी पाड्यात पहिल्यांदाच प्रकाश, ४० वर्षानंतर वीज पोहचली

आमदार सुनील शेळकेंच्या कुटुंबीयांवर जमिनीत उत्खननाचा आरोप, काकडेंकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT