mother killed her own son SaamTV
महाराष्ट्र

Crime News : आईच बनली वैरीण; अनैतिक संबंधामध्ये अडथळा, पोटच्या लेकाला प्रियकराच्या मदतीने संपवलं, अन्...

Kopargaon Mother Kill Son : अनैतिक संबंधामध्ये अडथळा ठरत असल्याने जन्मदात्या आईनेच प्रियकराच्या मदतीने पोटच्या मुलाची हत्या केल्याची घटना अहिल्यानगर जिल्ह्यात उघडकीस आली आहे.

Prashant Patil

अहिल्यानगर : कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारात २० डिसेंबर २०२४ रोजी गोदावरी नदी पात्रात पांढऱ्या कापडात गुंडाळलेल्या अवस्थेत चार वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला होता. शवविच्छेदन अहवालात त्या चिमुकल्याची हत्या करून नदी पात्रात फेकल्याचे उघड झाल्यानंतर पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवली. ही हत्या मयताची आई शितल बदादे आणि तिचा प्रियकर सागर वाघ यांनी केल्याचे पोलिस तपासात उघड झालं आहे.

अनैतिक संबंधामध्ये अडथळा ठरत असल्याने निर्दयीपणे चिमुकल्याची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी निर्दयी आई आणि तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपासाची चक्रे फिरवत या हत्येचा छडा लावला आहे. अनैतिक संबंधातून चिमुकल्या मुलाची हत्या झाल्याने मोठी हळहळ आणि रोष व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, वर्धा जिल्ह्यात देखील हत्येची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इंन्स्टाग्राम या सोशल मीडियावर स्टोरी पोस्ट केल्याच्या वादातून दोन भावंडांनी १७ वर्षीय युवकाचा चाकूने भोसकून खून केला. ही घटना हिंगणघाट तालुक्यातील पिंपळगाव येथे घडली आहे. हिमांशू किशोर चिमणे (वय १७, रा. संत कबीर वार्ड हिंगणघाट) असं मृत मुलाचं नाव आहे. या प्रकरणी तक्रारीवरून मानव धनराज जुगनाके (वय २१) आणि अनिकेत धनराज जुगनाके (वय २३) यांच्यावर हिंगणघाट पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT