Mumbai-Goa Highway Traffic : मुंबई-गोवा महामार्गावर ट्रॅफिक जाम, ५ ते ६ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा; प्रवासी ताटकळले

Mumbai-Goa Highway Traffic Jam : मुंबई आणि कोकणात जाणारे पर्यटक, प्रवासी माणगावमध्ये वाहतुक कोंडीत अडकले आहेत. अलिबाग ते वडखळ मार्गावर देखील वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
Mumbai Goa highway Traffic jam
Mumbai Goa highway Traffic jamSaamTV
Published On

रायगड : गोवा आणि कोकणात निघालेल्या पर्यटकांना मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहेत. माणगाव बाजारपेठ परिसरात ही वाहतूक कोंडी झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच माणगाव बाजारपेठेच्या दुतर्फा पाच ते सहा किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

मुंबई आणि कोकणात जाणारे पर्यटक, प्रवासी माणगावमध्ये वाहतुक कोंडीत अडकले आहेत. अलिबाग ते वडखळ मार्गावर देखील वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तीनविरा ते पोयनाड पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मुंबईकडे जाणाऱ्या लेनवरसुद्धा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अलिबाग, मुरुडला फिरायला आलेले पर्यटक परतीच्या मार्गावर दिसून येत आहे.

Mumbai Goa highway Traffic jam
MSRTC: राज्याची जीवनवाहिनी ST चा बदलणार चेहरामोहरा; एअरपोर्टप्रमाणे होणार एसटी डेपो

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com