Rahul Solapurkar : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांविषयीच्या वादग्रस्त विधानानंतर राहुल सोलापूरकरांनी मागितली माफी

Rahul Solapurkar Apologizes After Controversial Statement : राहुल सोलापूरकर यांनी डॅा. बाबासाहेब आंबेडकर हे वेदानुसार ब्राह्मण आहे. त्यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्यानंतर सोलापूरकर यांनी व्हिडिओ पोस्टकरून माफी मागितली आहे.
Rahul Solapurkar News
Rahul Solapurkar Apologizes After Controversial StatementSaam tv
Published On

पुणे : मराठी अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी काही दिवसापूर्वीच एका मुलाखतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. छत्रपती शिवाजी महाराज जे आग्र्यावरुन पेटाऱ्यात बसून नव्हे तर लाच देऊन सुटले होते, असे विधान सोलापूरकर यांनी केले होते. त्यांच्या या व्यक्तव्यावरून संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटले. त्यांचे हे प्रकरण आता कुठे शांत होत नाही तोच पुन्हा एकदा सोलापूरकर बरळले आहेत. यावेळी त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अक्षेपार्ह विधान केलंय. याचा व्हिडिओ शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट केला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेते सोलापूरकर यांनी माफी मागितली आहे.

शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ पोस्ट केलाय. हा व्हिडिओ अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या मुलाखतीचा आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलंय. यावरून नवीन वादाला तोंड फुटणार असल्याची शक्यता आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. त्यांच्या घराबाहेर दंगल नियंत्रक पथक देखील तैनात करण्यात आले आहे.

काय आहे व्हिडिओ

एका मुलाखतीत सोलापूरकर म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म रामजी सकपाळ नावाच्या व्यक्तीच्या घरात झाला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आंबावडेकर नावाच्या एका गुरुजीने दत्तक घेतले होते. त्यावेळी त्यांनी त्यांचे आडनाव डॉ. बाबासाहेबांना दिले. तेच पुढे भीमराव आंबेडकर म्हणून मोठे होतात. त्यांनी खूप अभ्यास केल्यामुळे वेदांमध्ये जसं म्हटलं आहे, 'सब ब्रम्ह जानतेही ब्राम्हणा'म्हणजे अभ्यास करून ते मोठे झाले आहेत. वेदांमध्ये भीमराव आंबेडकर हे ब्राह्मण ठरतात, असे सोलापूरकर म्हणाले.

Rahul Solapurkar News
Shivendraraje Bhosale: सोलापूरकर महाराष्ट्र पेटवण्याचं उद्योग करतायेत, त्यांना माफी नाहीच; शिवेंद्रराजे भोसले संतापले

यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी चांगलाच संताप व्यक्त केलाय. त्यांनी सोलापूरकर यांचा व्हिडिओ ट्वीट करून राहुल सोलापूरकरने आता सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत. हा जिथे दिसेल तिथेच त्याला जोड्याने मारायला हवा. याच्यासारख्या मनुवाद्यांनीच महाराष्ट्राचे , देशाचे वाटोळे केले आहे. राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितलेली नाही. आता तर डॅा बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत बोलून सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत. याच्या डोक्यावर नसलेले केस उगवावे लागतील; ते कसे उगवायचे, ते बहुजन अन् आंबेडकरवादी ठरवतील. या मनुवाद्यांनाच छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा का त्रास होतो, हेच समजत नाही. याला दिसेल तिथे तुडवा. असं आव्हाड म्हणाले.

राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर दंगल नियंत्रण पथक दाखल

वादग्रस्त विधान करून स्वतःला टीकेच धनी करून घेतलेल्या सोलपूरकरांच्या कोथरूड येथील घराबाहेर तीन दिवसांपासून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तो बंदोबस्त आजही कायम आहे. तर विश्वरत्न डॅा बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानवरून आंबेडकर अनुयायी आक्रमक झाले आहे.यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सोलापूरकर यांच्या घराबाहेर आताच दंगल नियंत्रण पथक दाखल झाले आहे.

Rahul Solapurkar News
Rahul Solapurkar : राहुल सोलापूरकरांविरोधात पुण्यात आंदोलन; कारवाईची मागणी | Video

राहुल सोलापूरकरांचा माफीनामा

माझ्या पॉडकास्टमधील काही वाक्ये वेगळी काढून सोशल मीडियावर मोठा गदारोळ झाला आहे. विशेषतः हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याहून सुटकेच्या संदर्भात बोलताना माझ्याकडून अनावधानाने एक चुकीचा शब्द गेला. यामुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्या असतील, याची मला पूर्ण जाणीव आहे, आणि त्याबद्दल मी जाहीर माफी मागतो.तसेच, बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल एक व्हिडिओ समोर आला आहे. मी अनेक व्याख्यानांमधून बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा गौरव करत आलो आहे. तरीदेखील हे प्रकरण समोर का आणले जात आहे, याबाबत मी अनभिज्ञ आहे.मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो की, माझ्या बोलण्याचा हेतू कुणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता. महान व्यक्तींना कमी लेखण्याचा किंवा त्यांच्या कार्याचा अवमान करण्याचा कधीही प्रयत्न होणार नाही.शिवभक्त तसेच बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी यांच्या भावनांचा मी सन्मान करतो आणि माझ्या शब्दांमुळे कुणाला दुखावले गेले असल्यास मी मनःपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com