Ahilyanagar Crime Saam tv
महाराष्ट्र

Ahilyanagar Crime : पूर्ववैमनस्यातून तरुणांचा राडा; लाठ्याकाठ्यांनी हाणामारी, महिलेसह तरुण जखमी

Ahilyanagar News : संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली

Rajesh Sonwane

सुशील थोरात 

अहिल्यानगर : शहरातील दिल्लीगेट परिसरातील म्युन्सिपल कॉलनीत गुरूवारी संध्याकाळच्या सुमारास दोन गटांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना घडली. यातून झालेल्या मारहाणीत महिलांसह काही तरुण जखमी झाले असून, पूर्वीच्या वादातूनच ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. यासंदर्भात अद्याप पर्यत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या यात्रेदरम्यान डीजे वाजवण्याच्या कारणावरून वाद झाला होता. त्या वादाचा मनात राग धरून गुरूवारी सायंकाळी दहा ते बारा जणांच्या जमावाने हैदोस घालण्यास सुरवात केली. यात चव्हाण कुटुंबाच्या घर आणि कार्यालयावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला चढविला. अचानक झालेल्या या हल्ल्यात मारहाणीसह गाड्यांची देखील मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली. 

सीसीटीव्ही कॅमेरात घटना कैद 
दरम्यान या तरुणांनी काठ्यांनी मारहाण देखील केली. यामध्ये महिलेसह तरुण जखमी झाले आहे. झटापटीत जखमी झालेल्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

अद्याप गुन्हा दाखल नाही 
दरम्यान घटना घडल्यानंतर पोलीस घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. तसेच पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. तर घटनेबाबत तक्रार द्यायला कोणीही पुढे आले नसल्याने अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. तक्रार येताच गुन्हा दाखल केला जाईल; अशी माहिती संबंधित तोफखाना पोलीस ठाण्याकडून देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोनसाखळी चोरी प्रकरणातील इराणी टोळीतील आरोपीला अटक

Shocking News: लिफ्टच्या दारात केस अडकले अन् डोकं चिरडलं, ५२ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू

Chhatrapati Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा पिंपरी चिंचवडमध्ये, पाहा डोळे दिपवणारे फोटो

Swelling Issues : सकाळी हात पाय सुन्न पडतात? कारणं आणि उपाय जाणून घ्या

Jannat Zubair And Elvish Yadav: फैजलनंतर जन्नत झुबेर करते एल्विश यादवला डेट? 'त्या' फोटोमुळे चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT