Kolhapur Crime : दिवसभर फिरत रेकी अन् रात्री घरफोडी; दोघांना अटक, पंधरा गुन्हे उघडकीस

Kolhapur News : दोघेही चालक म्हणून काम करतात. दिवसभर वाहने चालवतात. स्थानिक वस्तीची नेमकी माहिती टिपत होते. दिवसा त्यांचे बंद घरांवर अधिक लक्ष असायचे. रात्रीही कोणी येणार नाही; अशा ठिकाणी रात्री चोरी करत
Kolhapur Crime
Kolhapur CrimeSaam tv
Published On

रणजित माजगावकर 

कोल्हापूर : कोणाला काही संशय येऊ नये यासाठी दिवसभर ठिकठिकाणी मोटारीतून जाऊन फिरायचे. यानंतर गावांमध्ये जाऊन पाहणी करायचे. यानंतर रात्रीच्या सुमारास जाऊन घरफोडी करण्याचे प्रकार करत होते. पोलिसांनी या चोरट्यांचा शोध लावत दोघांना ताब्यात घेत मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आला आहे. त्यांची चौकशी केली असता पंधरा गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. 

मोटारीतून फिरून रेकी केल्यानंतर रात्री घरफोडी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. सुभाष शंकर काळे आणि सागर चंद साळुंखे अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेले सुभाष काळे, सागर साळुंखे दोघेही चालक म्हणून काम करतात. दिवसभर वाहने चालवतात. स्थानिक वस्तीची नेमकी माहिती टिपत होते. दिवसा त्यांचे बंद घरांवर अधिक लक्ष असायचे. या ठिकाणी रात्रीही कोणी येणार नाही; अशा ठिकाणी रात्री कोणीही येणार नाही, याची दक्षता बाळगून घरफोडी करीत होते.

Kolhapur Crime
Kalyan : इलेक्ट्रॉनिक वस्तू रिपेअरिंगच्या नावाखाली परदेशी दारु विक्री; उल्हासनगरमध्ये मोठी कारवाई

पंधरा घरफोडीचे गुन्हे उघड 

दरम्यान पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्यानंतर कोल्हापूर शहर परिसरातील शाहूवाडी, कोडोली, वडगाव, हातकणंगले, शिरोळ, इस्पुर्ली, कागल अशा पंधरा ठिकाणी घरफोड्या केल्याचे गुन्हे उघडकीस आले आहेत. तर त्या दोघांकडून १३ तोळे सोने, सव्वाकिलो चांदीचा ऐवज आणि मोटार जप्त करण्यात आली. पोलिसांकडून आणखी तपास सुरु आहे. 

Kolhapur Crime
Lumpy Disease : जळगाव जिल्ह्यात लम्पी आजाराचे थैमान; गुराच्या बाजारावर बंदी

अकोल्यात २६ किलो गांजा जप्त

अकोला : अकोला पोलिसांनी २६ किलो गांजा जप्त करून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. गांजाची खरेदी- विक्री करताना या दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यातील एमआयडीसी हद्दीत एसडीपीओ पथकाने छापा टाकून ही कारवाई केली आहे. २६ किलो गांजा जप्त असून त्याची किंमत ५ लाख २५ हजार इतकी आहे. अकोल्यातल्या नीलकंठ सहकारी सुतगिरणी समोर आरोपी मोहम्मद जाकीर अब्दुल कदिर व समीर खान मेहबूब खान हे गांजाची खरेदी-विक्री करत असताना पकडले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com