Lumpy Disease : जळगाव जिल्ह्यात लम्पी आजाराचे थैमान; गुराच्या बाजारावर बंदी

Jalgaon News : एरंडोल, मुक्ताईनगर, पारोळा, धरणगाव, भडगाव, चोपडा, रावेर या तालुक्यातील २८ गावांमध्ये लम्पीची लागण झाल्याचे आढळून आले. जिल्हाधिकारी यांनी रोगप्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे आदेश
Lumpy Disease
Lumpy DiseaseSaam tv
Published On

जळगाव : साधारण तीन वर्षांपूर्वी राज्यभरात लम्पी आजाराने थैमान घातले होते. यामुळे त्यावेळी गुरांच्या बाजारावर बंदी घालण्यात आली होती. यानंतर पुन्हा एकदा लम्पी आजराने डोके वर काढले असून जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुरांना लम्पी आजाराची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. यात का गुराचा लम्पीमुळे मृत्य झाल्याची नोंद झाली असून प्रशासनाकडून लसीकरणाला सुरवात करण्यात आली आहे. 

जळगाव जिल्ह्यात लम्पी या विषाणूजन्य आजाराचा प्रसार वाढत चालला असून जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये गुरांवर लंम्पी आजार होताना दिसून येत आहे. तर अनेक गुरांना लंम्पीची लागण झाल्याचे दिसून येत आहे. यावर उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने तात्काळ लसीकरणास सुरुवात करण्यात आली असली तरी लंम्पी आजारामुळे एका गुराचा मृत्यू देखील झाल्याची नोंद झाली आहे. 

Lumpy Disease
Drone Medicine Delivered : केवळ १५ मिनिटांत 'ड्रोन'ने सातपुड्यात पोहोचवली लस; ड्रोनद्वारे औषध पोहोचवण्याचा राज्यातला दुसरा प्रयोग यशस्वी

२८ गावांमध्ये अधिक प्रमाण 

जिल्ह्यातील एरंडोल, मुक्ताईनगर, पारोळा, धरणगाव, भडगाव, चोपडा, रावेर या तालुक्यातील २८ गावांमध्ये लम्पीची लागण झाल्याचे आढळून आले आहे. यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रोगप्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे आदेश जारी केले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियमनुसार आदेश काढले आहेत. 

Lumpy Disease
Kalyan : इलेक्ट्रॉनिक वस्तू रिपेअरिंगच्या नावाखाली परदेशी दारु विक्री; उल्हासनगरमध्ये मोठी कारवाई

गुरांचे सार्वजनिक बाजार बंद 

कासोदा, पारोळा, धरणगाव व रावेर येथील गुरांचे सार्वजनिक बाजार पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत. तसेच आंतरराज्य, आंतरजिल्हा व आंतर तालुका पशु वाहतूक तात्पुरती बंद ठेवण्यात यावी. फक्त लंपी प्रतिबंधक लस टोचून २८ दिवस पूर्ण झालेल्या जनावरांस वाहतुकीस प्रमाणपत्रासह परवानगी दिली जाईल. असे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पशुधनाच्या आरोग्यास बाधा पोहोचू नये म्हणून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com