Ahilyanagar Crime Saam tv
महाराष्ट्र

Ahilyanagar Crime : दारू पिऊ देण्यास विरोध; टोळक्याचा हॉटेलवर हल्ला, पाच जण जखमी

Ahilyanagar News : क्षुल्लक कारणांवरून वादावादी व हाणामारीच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशाच प्रकारे अहिल्यानगर जिल्ह्यात एक घटना समोर आली आहे. यात हॉटेलवर काहीजण जेवण करण्यासाठी आले होते

Rajesh Sonwane

सुशील थोरात 

अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील काही जणांनी शनिवारी रात्री उशिरा करंजी गावातील एका हॉटेलवर हल्ला चढविला. या हल्ल्यात पाच जण जखमी झाले असून या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. दरम्यान हा हल्ला दारू [पिऊ न दिल्याच्या कारणातून करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

क्षुल्लक कारणांवरून वादावादी व हाणामारीच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशाच प्रकारे अहिल्यानगर जिल्ह्यात एक घटना समोर आली आहे. यात हॉटेलवर काहीजण जेवण करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी हॉटेलमध्ये दारू पिण्याची तयारी केली होती. मात्र हॉटेलमध्ये दारू पिण्यास मनाई असल्याने संबंधितांना मद्य सेवन करण्यास मज्जाव करण्यात आला. यातून त्यांनी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली.  

दगडफेक करत मारहाण 

मद्य प्राशन करू न देण्याच्या कारणावरून संबंधितांनी हॉटेल कर्मचाऱ्यांशी वाद घातला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. तसेच काही जणांनी हॉटेलवर दगडफेक देखील केली. तर हॉटेलमध्ये प्रवेश करत येथील कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. या हाणामारीत तीन जण गंभीर जखमी झाले असून या जखमींना उपचारार्थ अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले आहे. 

गावात सकाळपासून कडकडीत बंद 
दरम्यान टोळक्याने केलेल्या हल्ल्यात एका जखमीचा डोळा निकामी झाला आहे. तर एका जखमीस ४५ टाके पडले आहेत. दरम्यान या घटनेनंतर खळबळ उडाली असून याचे पडसाद गावात दिसू लागले आहेत. करंजी येथील सलमान जमादार पठाण टोळीला अटक करण्याच्या मागणीसाठी आज करंजी गावात सकाळपासून कडकडीत बंद पाडण्यात येत आहे. यामुळे पोलीस आता काय पाऊले उचलतात याकडे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parbhani : आदर्श शेतवाटणी! दोन प्राध्यापक भावांनी शेतकरी भावाला दिला अधिक हिस्सा; मुलांचे शिक्षण व लग्नाचीही घेतली जबाबदारी

Crime News: मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने पित्याला अमानुष मारहाण; पाहा, VIDEO

Stress Relief: फक्त ५ मिनिटांत ताण कमी करण्यासाठी प्रभावी मानसिक उपाय

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

SCROLL FOR NEXT