Akole News Saam tv
महाराष्ट्र

Akole News : राजूरमध्ये काविळचे थैमान सुरूच; २५० च्यावर पोहचली रुग्ण संख्या

Ahilyanagar News : अकोले तालुक्यात असलेल्या राजुर गावात कावीळची साथ मागील दहा- बारा दिवसांपासून पसरली आहे. काविळीच्या साथीने जोर धरला असून गेल्या काही दिवसातच २५० हून अधिक रुग्णांची नोंद झाली

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

अकोले (अहिल्यानगर) : अकोले तालुक्यातील राजूर गावात मागील काही दिवसांपासून काविळचे थैमान सुरू आहे. अजूनही गावातील रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. आजही गावातील रुग्णांची वाढती असून रुग्ण संख्या २५० च्या वर पोहचली आहे. लहान मुलांमध्ये हे प्रमाण अधिक असून अनेक रुग्ण आजही उपचारासाठी दाखल आहेत. दरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस केली. 

अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असलेल्या राजुर गावात कावीळची साथ मागील दहा- बारा दिवसांपासून पसरली आहे. काविळीच्या साथीने जोर धरला असून गेल्या काही दिवसातच २५० हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. गावातील अनेक रुग्ण संगमनेर, राजूर आणि अकोले येथील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. रुग्णांमध्ये लहान मुलांची संख्या लक्षणीय आहे.

दोन मुलींचा झालाय मृत्यू
अहिल्यानगर जिल्ह्यातील राजूर गावात काविळच्या आजाराने थैमान घातले असून दोन मुलींना आपला जिव गमवावा लागला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असून दूषीत पाण्यामुळे गावात काविळचा मोठा फैलाव झाला आहे. अनेक जणांवर शासकीय आणि खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. तर आरोग्य यंत्रणेकडून यावर उपाययोजना आखल्या जात असल्या तरी अजूनही रुग्ण संख्या कमी झालेली नाही. 

पालकमंत्र्यांनी केली रुग्णांची विचारपूस 

गावातील वाढती रुग्ण संख्या चिंतेचा विषय बनला आहे. तर आज पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी आणि प्रशासन राजूर गावात पोहचले. ग्रामीण रुग्णालयात जात रुग्णांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी आरोग्य यंत्रणेला खडसावत लोकांना फक्त सल्लेच देणार का? रूग्णांची प्रतीकारशक्ती वाढवण्यासाठी डायेट प्लॅन तयार करा. तसेच रूग्णांना शासनाकडून आहार द्या; अशा सूचना केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT