Anganwadi Worker Saam tv
महाराष्ट्र

Anganwadi Worker Strike : अंगणवाडी सेविका आक्रमक; भंडाऱ्यात चटणी भाकर आंदोलन, यवतमाळमध्ये रास्ता रोको

Bhandara News : संपूर्ण महाराष्ट्रात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांना घेऊन बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. मागण्यांबाबत प्रशासनाकडून अद्याप निर्णय होत नसल्याने अंगणवाडी सेविका संपावर ठाम आहेत

Rajesh Sonwane

शुभम देशमुख/संजय राठोड 
भंडारा
: संपूर्ण महाराष्ट्रात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांना घेऊन बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. मागण्यांबाबत प्रशासनाकडून अद्याप निर्णय होत नसल्याने (Anganwadi Worker) अंगणवाडी सेविका संपावर ठाम आहेत. या दरम्यान आज देखील आंदोलन करण्यात आले असून (Bhandara) भंडाऱ्यात चटणी भाकर खाऊन व यवतमाळमध्ये रास्ता रोको आंदोलन करत निषेध करण्यात आला. (Breaking Marathi News)

भंडारा येथील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर मागील ४ डिसेंबरपासून बेमुदत संप सुरू आहे. संपाच्या २५ व्या दिवशी भंडारा जिल्हा परिषद समोर आयटक एचएमएस या संघटनेच्यावतीने संपात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी चटणी भाकर आंदोलन करून शासनाप्रती आपला रोष व्यक्त केला. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या चटणी भाकर आंदोलनाने जिल्ह्यातील संपूर्ण नागरिकांचे लक्ष वेधले आहे. मात्र प्रशासनाने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याने कर्मचाऱ्यांनी शासनाप्रती तीव्र रोष व्यक्त केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यवतमाळमध्ये दोन तास रास्तारोको
यवतमाळ : विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचार्‍यांनी (Yavatmal) जेलभरो आंदोलन केले. आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी कर्मचार्‍यांनी तब्बल दोन तास जुन्या बसस्थानक चौकात ठिय्या देत रास्ता रोको केला. यावेळी केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देत परिसर दणाणून सोडला. अंगणवाडी सेविकांचा अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मात्र, शासनाकडून कर्मचार्‍यांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप अंगणवाडी सेविकांचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

४०-५० विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस थेट २०० फूट खोल दरीत कोसळली, विद्यार्थी बसमध्ये अडकले, VIDEO

Maharashtra Live News Update : पुण्यात इमारतीच्या सहाव्या मजल्यावर भीषण आग

Chanakya Niti: या ५ ठिकाणी माणसाने कधीच पाऊल ठेवू नये, नाहीतर इज्जतीला लागेल कलंक

Horrific Accident : भीषण अपघातात भाजप नेत्यासह दोघांचा मृत्यू; राजकीय वर्तुळात शोककळा

धक्कादायक! रेड लाइट एरियात १२ वर्षीय मुलीला विकण्याचा प्रयत्न, आरोपीला स्थानिकांनी पकडून चोपलं

SCROLL FOR NEXT