Wardha Monkey News Saam Tv
महाराष्ट्र

Wardha Monkey News: आई तुझं लेकरू, येडं गं कोकरू...अपघातात आईला गमावलं, माकडाच्या पिल्लानं टेडी बीअरमध्ये शोधलं आईचं प्रेम (Video)

Shivani Tichkule

चेतन व्यास, वर्धा

Wardha News Today: माणूस असू की प्राणी आई हा सर्वांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. आपली आई ही सर्वांना प्रिय असते. एखादे संकट उभे ठाकले किंवा अचानक पायाला ठेच लागली तर आपसूक नकळत आपल्या ओठातून एकच नाव येते ते म्हणजे आई. आई आणि मुलाचे आयुष्य इतकं गुंफलेलं असतं की, कितीही अडचणी आल्या तरी आई प्रत्येक पात्रात स्वत:ला सामावून घेत असते. (Latest Marathi News)

मग ते पात्र कोणतही असो शाळेतील शिक्षकाचे, मार्गदर्शकाचे किंवा चांगल्या मित्राचे. यामुळेच आईचा भावनिक आधार मुलाला नेहमी पुढे जाण्यास प्रेरित करतो आणि एक चांगला माणूस बनण्यास मदत करत असतो. मात्र, वर्धा जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. ही घटना कुठल्याही आई आणि मुलाची नाही तर एका माकडाच्या पिल्लू आणि त्याच्या दगावलेल्या आईची आहे.

अपघातात (Accident) आई गमावलेल्या माकडाच्या एका पिल्लाचा टेडी बीअरने सांभाळ केला आहे. टेडी बीअरला आपली आई समजत हे पंधरा दिवसांचे पिल्लू आता दोन महिन्यांचे झाले आहे. माकडाच्या (Monkey) पिल्लाच्या आईचा अपघातात मृत्यू झाल्यावर अवघ्या पंधरा दिवसांच्या पिल्लाचा सांभाळ करण्याचे आव्हान वर्ध्यातील प्राणी मित्रांपुढे होते. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आहे.

गेल्या दीड महिन्यांपूर्वी वर्ध्यात समृद्धी महामार्गावर रस्ता ओलांडताना माकडाच्या कडपातील एका मादी माकडाचा अपघात झाला. अपघातात मादी माकडाला आपला जीव गमवावा लागला. रस्त्यावर आई रक्तभंबाळ झाली असताना अवघ्या पंधरा दिवसाचे पिल्लू आईला बिलगून होते. (Wardha News)

मादी माकड आणि पिल्लाला करूणा श्रमातआणण्यात आले. आईच्या मृत्यूनंतर पिल्लाचा सांभाळ करण्याचे आव्हान प्राणिमीत्रांपुढे होते. त्यावर पिल्लाला आई मिळवून देण्यासाठी प्राणीमीत्रांनी एक शक्कल लढविली.

टेडी बीअर म्हणजेच खेळण्यातलं मोठं बाहुलं या पिल्लाजवळ ठेवलं. हळूहळू या निर्जीव बाहुल्यात माकडाच्या पिल्लाने आपली आई शोधली. बहुल्याच्या शरीराला दुधाची बॉटल बांधून शेळीचे दूध पिल्लाला पाजण्यास सुरवात केली. दिवसेंदिवस माकडाचे पिल्लू आणि टेडी बीअरयांच्यातील नाते घट्ट झाले आणि टेडी बीअरलाच आपली आई समजत हे पंधरा दिवसांचे पिल्लू आता दोन महिन्यांचे झाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT