
Temple Dress Code: महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने नागपुरातील चार मंदिरात वस्त्र संहिता लागू करण्यात आली आहे. मंदिरातील पावित्र्य जपण्यासाठी ही वस्त्र संहिता लागू केल्याचं महासंघाच्या वतीने सांगण्यात आले. तसेच पहिल्या महिन्यात राज्यभरातील ३०० पेक्षा जास्त मंदिरांमध्ये हा नियम लागू करावा यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती मंदिर महासंघाने दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात वस्त्र संहिता लागू आहे. देशातील अनेक मंदिरे, गुरुद्वारा, चर्च, मशिदी आणि इतर प्रार्थना स्थळी वस्त्र संहिता लागू आहे, त्याच धर्तीवर राज्यातील मंदिरांमध्ये वस्त्र संहिता लागू करण्याचा निर्णय मंदिर महासंघाने घेतला आहे. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी तोकडे, अंगप्रदर्शन करणारी अथवा उत्तेजक कपडे परिधान केल्यास त्यांना दर्शन घेता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मंदिर महासंघाने मांडली आहे.
नागपूरातील गोपाळ कृष्ण मंदिर, धनतोली, संकटमोचन पंचमुख हनुमान मंदिर, बेलोरी, बृहस्पती मंदिर, कोन्होलीबारा आणि दुर्गामाता मंदिर हिलटॉप या मंदिरांचा समावेश आहे. तोकडे कपडे घालून मंदिरात आल्यास त्यांना ओढणी, पंचा दिला जाईल, त्यानंतर त्यांना प्रवेश दिला जाईल. यासंदर्भात प्रचार प्रसारही केला जाणार असल्याचं महासंघाच्या वतीनं सांगण्यात आले आहे.
दरम्यान, या आधी तुळजापूर मंदिर (Tuljapur Mandir) समितीने देखील असा निर्णय घेतला होता. पण काही तासांतच समितीला हा निर्णय मागे घ्यावा लागला. पण नागपूरच्या चार मंदिरामध्ये आजपासून हा नियम लागू करण्यात आला आहे. अंगप्रदर्शक, उत्तेजक, असभ्य, अशोभनीय व तोकडे वस्त्र तसेच असात्विक वेशभूषा करून मंदिरात प्रवेश करू नये. भारतीय संस्कृतीचे पालन करून सात्विक वेशभूषेतच दर्शन घ्यावे", अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले आहे. (Latest Marathi News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.