ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
चेहऱ्यावरील नको असलेले केस हलके करण्यासाठी फेस ब्लीचचा वापर केला जातो.
ब्लीचमध्ये अशी रसायने असतात जी त्वचेला नुकसान पोहोचवू शकतात, म्हणून ब्लीच चेहऱ्यावर लावण्यापूर्वी या गोष्टी नक्की जाणून घ्या.
काही लोकांना ब्लीचची अॅलर्जी असू शकते, ज्यामुळे खाज, जळजळ आणि चेहऱ्यावर लालसरपणा येऊ शकतो.
ब्लीच केल्यानंतर कडक उन्हात जाणे टाळावे. नाहितर त्वचेला त्रास होण्यास सुरुवात होते.
ब्लीचिंगमुळे त्वचेची छिद्रे बंद होऊ शकतात, ज्यामुळे पिंप्लस येऊ लागतात.
ब्लीचचा अतिवापर केल्याने त्वचा घट्ट होऊ शकते आणि सुरकुत्या वाढू शकतात.
ब्लीच त्वचेतील नैसर्गिक तेल काढून टाकू शकते, ज्यामुळे त्वचा कोरडी होऊ शकते.
सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येण्यापूर्वी किंवा नंतर ब्लीच लावू नये, आणि त्यानंतर त्वचेला आरामदायी लोशन किंवा कोरफडीच्या जेलने मॉइश्चराइझ करावे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.