ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिवाळ्यात त्वचा कोरडी, रफ व निस्तेज होते. थंड हवा आणि कमी आर्द्रतेमुळे त्वचेला अतिरिक्त पोषणाची गरज असते.
त्वचेच्या संरक्षणासाठी फेसपॅक लावणे गरजेचे मानले जाते. फेसपॅकमुळे त्वचेला ओलावा, पोषण आणि नैसर्गिक चमक मिळते. नियमित फेसपॅक वापरल्यास ड्रायनेस व पिग्मेंटेशन कमी होते.
हा फेसपॅक ड्राय स्किनसाठी बेस्ट आहे. मध त्वचेला मॉइश्चर देतो तर दही त्वचा मऊ आणि स्मूथ करते. १ चमचा मध आणि १ चमचा दही, १५ मिनिटे लावून ठेवा.
कोरड्या व निस्तेज त्वचेसाठी केळी आणि मधाचा फेसपॅक वापरावा.केळ्यात नैसर्गिक तेलं आणि व्हिटॅमिन्स असतात. त्याने त्वचा सॉफ्ट व ग्लोइंग होते. मॅश केलेली केळी आणि मध मिक्स करा . मिक्स केल्यावर ते चेहऱ्यावर लावा. १५ ते २० मिनिटे झाल्यावर चेहरा धुवून टाका.
हे मिश्रण सर्व त्वचेसाठी लावण्यास योग्य आहे. दूध त्वचा पोसते तर बेसन डेड स्किन काढतो. त्वचा उजळ दिसते. १ चमचा बेसन आणि दूध, १५ मिनिटे लावून ठेवा.
संवेदनशील त्वचेसाठी बेस्ट फेकपॅक मानला जातो. अॅलोव्हेरा थंडावा देतो व गुलाबजल त्वचा ताजीतवानी ठेवते. अॅलोवेरा जेल आणि गुलाबजल मिक्स करा आणि २० मिनिटे लावून ठेवा.
खूप कोरड्या त्वचेसाठी हा फेसपॅक वापरावा.बदाम तेल त्वचेला खोल पोषण देते आणि सुरकुत्या कमी दिसण्यास मदत होते. ५ ते ६ थेंब बदाम तेल आणि मध घेऊन १५ मिनिटे लावून ठेवा.
फेसपॅक लावण्याआधी चेहरा स्वच्छ करून घ्या. आठवड्यातून २ वेळा हे फेसपॅक वापरा. फेसपॅक लावून झाल्यावर चेहरा धुताना कोमट पाणी वापरा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.