Shruti Vilas Kadam
केस पांढरे होण्यामागे व्हिटॅमिन B12, आयर्न, प्रोटीन आणि कॉपरची कमतरता कारणीभूत ठरते. हिरव्या भाज्या, डाळी, फळे, दूध, अंडी, कडधान्ये आणि सुकामेवा आहारात समाविष्ट करा.
आवळा केसांसाठी अतिशय फायदेशीर मानला जातो. आवळ्याचा रस, चूर्ण किंवा आवळ्याचे तेल नियमित वापरल्यास केसांचा नैसर्गिक रंग टिकून राहण्यास मदत होते.
नारळाच्या तेलात कढीपत्त्याची पाने उकळून ते तेल आठवड्यातून 2 वेळा केसांना लावा. यामुळे केस मजबूत होतात आणि पांढरे होण्याची प्रक्रिया मंदावते.
केसांवर जास्त प्रमाणात कलर, स्ट्रेटनर, ब्लो ड्रायर यांचा वापर केल्यास केस लवकर पांढरे होतात. शक्यतो नैसर्गिक उत्पादने वापरा आणि हीट टूल्सपासून दूर रहा.
अतिताणामुळे केसांच्या मुळांवर परिणाम होतो. योग, ध्यान, प्राणायाम आणि पुरेशी झोप घेतल्यास केसांचे आरोग्य सुधारते.
आठवड्यातून 2–3 वेळा सौम्य शॅम्पूने केस धुवा आणि नियमित तेलाचा मसाज करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि केस निरोगी राहतात.
मेंदी, कॉफी, काळी चहा पावडर यांसारखे नैसर्गिक उपाय केसांना हानी न पोहोचवता रंग टिकवण्यास मदत करतात.