Fabric For Winter: 'हे' पाच प्रकारचे कापड तुम्हाला हिवाळ्यातही उबदार ठेवतात, तुमच्याकडे आहेत का या कापडाचे कपडे?

Shruti Vilas Kadam

लोकरी (Wool)

हिवाळ्यासाठी सर्वात लोकप्रिय आणि प्रभावी कापड म्हणजे लोकरी. हे शरीराची उष्णता टिकवून ठेवते आणि तीव्र थंडीपासून संरक्षण देते. स्वेटर, शॉल, जॅकेटसाठी लोकरी उत्तम पर्याय आहे.

Fabric For Winter

कश्मिरी (Cashmere)

कश्मिरी लोकरीपेक्षा हलकी, मऊ आणि अधिक उबदार असते. संवेदनशील त्वचेसाठी हे फॅब्रिक खूप आरामदायक आहे. स्टायलिश स्वेटर आणि शॉलसाठी कश्मिरी फॅब्रिक वापरले जाते.

Fabric For Winter

फ्लॅनल (Flannel)

फ्लॅनल हे मऊ आणि जाडसर कापड असून हिवाळ्यातील रोजच्या वापरासाठी योग्य आहे. शर्ट, पायजमा आणि बेडशीटसाठी फ्लॅनल खूपच आरामदायक ठरते.

Fabric For Winter

फ्लीस (Fleece)

फ्लीस हे हलके, उबदार आणि पटकन सुकणारे फॅब्रिक आहे. हिवाळ्यातील जॅकेट्स, स्वेटशर्ट आणि ट्रॅकसूटसाठी फ्लीसचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.

Fabric For Winter

व्हेल्वेट (Velvet)

व्हेल्वेट फॅब्रिक जाड आणि रॉयल लुक देणारे असते. हिवाळ्यातील पार्टीवेअर, साड्या, कुर्ते आणि ड्रेसेससाठी हे कापड उत्तम ठरते.

Fabric For Winter

कॉर्डरॉय (Corduroy)

कॉर्डरॉय हे जाडसर आणि मजबूत कापड असून थंडीपासून चांगले संरक्षण देते. पॅन्ट, जॅकेट आणि स्कर्टसाठी हे फॅब्रिक हिवाळ्यात खूप वापरले जाते.

Fabric For Winter

थर्मल फॅब्रिक (Thermal Fabric)

थर्मल कपडे शरीराची उष्णता आतच ठेवतात आणि बाहेरील थंडीपासून संरक्षण करतात. हिवाळ्यातील इनरवेअर म्हणून थर्मल फॅब्रिक अत्यंत उपयुक्त ठरते.

Fabric For Winter

थंडीत चेहरा काळा पडतोय? घरातला फक्त एक पदार्थ वापरा, चेहरा हिऱ्यासारखा चमकेल, गाल होतील मऊ-मऊ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care | Saam Tv
येथे क्लिक करा