sachin ahir saam tv
महाराष्ट्र

Aditya Thackeray: शिंदेसेनेत गेलेल्या सचिन अहिर यांच्यावर होणार मोठी कारवाई; ठाकरेंचा थेट इशारा

Maharashtra politics: सचिन अहिर यांनी ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे सेनेत प्रवेश केला आहे. या घडामोडीनंतर आदित्य ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया देत पक्ष सोडणाऱ्यांवर योग्य कारवाई केली जाईल, असा इशारा दिला असून महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

Surabhi Jayashree Jagdish

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे. नुकतेच ठाकरे गटाचे सहा खासदार शिंदे गटात गेल्यानंतर आता मातोश्रीतील विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे सचिन अहिर यांनीही ठाकरेसेनेची साथ सोडलीये. उद्धव ठाकरे मराठवाडा आणि विदर्भाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर असतानाच एकनाथ शिंदे यांनी सचिन अहिर यांच्याशी संपर्क साधून त्यांची मनधरणी केली. इतकंच नाही तर सचिन अहिर यांनी सभापती पदाच्या निवडणुकीसाठी शिंदेसेनेकडून उमेदवारी अर्जही भरलाय.

सचिन अहिर यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर ठाकरे सेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावर कारवाईचा इशारा दिला आहे. या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून, आता पक्ष नेतृत्व याबाबत नेमका काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागलं. त्यामुळे आगामी काळात सचिन अहिर यांच्यावर कोणती कारवाई केली जाणार हे पाहावं लागणार आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

आदित्य ठाकरे म्हणाले, "ज्या जवळच्या लोकांना पक्षाकडून सर्वकाही मिळतं, तेच स्वतःच्या स्वार्थासाठी निघून जातात. त्यामुळे यात धक्का बसण्यासारखं काहीही नाही."

वरळी आणि शिवडी हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचा दावा करत ते म्हणाले, "वरळी आणि शिवडी हा आमचा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे. आम्ही तिथे सातत्याने काम केलं आहे. त्यामुळे कोणाच्या जाण्याने आम्हाला धक्का बसत नाही."

यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवरही निशाणा साधला. "अजून काय पाहिजे तुम्हाला? अजून किती ओरबाडणार? अनेक पदं देऊनही अजून काय हवं आहे?" असा सवाल त्यांनी केला.

पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांवर टीका करत आदित्य ठाकरे म्हणाले, "जे आपल्या मंदिरांची लूट करत आहेत, त्यांच्यासोबत तुम्ही कसे बसू शकता? ज्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलायचं आहे, त्यांच्यासोबत तुम्ही कसे जाऊ शकता?" असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

यावेळी त्यांनी 'ऑपरेशन टायगर'वरही भाष्य केले. "आम्ही सखोल अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की, हे 'ऑपरेशन टायगर' नसून 'ऑपरेशन देवेंद्र फडणवीस' आहे आणि त्याचाच हा परिणाम आहे," असा आरोप त्यांनी केला.

उपसभापतीपदाबाबतही त्यांनी भाजपवर निशाणा साधला. "उपसभापतीपदावर भाजपचाच एखादा कार्यकर्ता का बसलेला नाही? याचा विचार भाजपनेच करायला हवा," असे ते म्हणाले.

पक्षांतर्गत कारवाईबाबत विचारले असता, "जी काही योग्य कारवाई असेल ती आम्ही निश्चितपणे करू. असं आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तसंच भाजपच्या कार्यकर्त्यांबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. "भाजपचे अनेक कार्यकर्ते वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करत आहेत. मग त्यांना कोणतेही मोठे पद का मिळत नाही?" असा सवाल त्यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील विश्रांती नगर परिसरात गवा अडकला

Brain tumor: ब्रेन ट्यूमर झाल्यावर सर्वात पहिलं लक्षणं कोणतं दिसून येतं?

Maharashtra Politics: राज्यात ऑपरेशन टायगर 3 सुरू; ठाकरेंचे सचिन आहिर फुटल्यानंतर शिंदेंची तुफान टोलेबाजी

Ketan Agarwal Case: चालण्यावरून आरोपीची ओळख पटणार? केतन अग्रवाल प्रकरणात होणार ‘गेट ॲनालिसिस'

PM Kisan Yojana : ... तर या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचा २४ वा हप्ता, महत्त्वाची अपडेट समोर

SCROLL FOR NEXT