Aditya Thackeray Saam Tv
महाराष्ट्र

"शिवसेनेच्या ज्या आमदारांना फसवून नेलं, त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे आजही खुले"

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे पक्षवाढीसाठी कंबर कसत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : महाराष्ट्रात राजकीय वादळ निर्माण करणाऱ्या एकनाथ शिंदे गटाने सत्तांतर केलं. भाजपचे शंभरहून अधिक आमदार असतानाही मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) विराजमान झाले. त्यामुळे शिंदे गटाचा राज्याच्या राजकारणात दबदबा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर दुसरीकडे बंडखोर आमदारांना धडा शिकवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) पक्षवाढीसाठी कंबर कसत आहेत. आदित्य यांनी निष्ठा यात्रेला सुरुवात केली आहे. बोरीवलीच्या एका कार्यक्रमात ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर सडकून टीका केली. पण शिवसेनेच्या (shivsena) ज्या आमदारांना पळवून नेलं, ज्यांना फसवून नेण्यात आले, त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे अजूनही खुले असल्याचं यावेळी ठाकरे म्हणाले.

शिवसैनिकांशी संवाद साधताना ठाकरे पुढे म्हणाले, मी दिसलो पाहिजे. नाहीतर तुम्हाला वाटेल मी गुवाहाटीला गेलो. ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला, प्रेम आणि हवं ते सगळं दिलं. त्यांनी आपला विश्वासघात केला. आपल्या पाठीत खंजीर खुपसलं. सत्तेतून पळून जाणं हे पहिल्यांदाच दिसलं. स्वतः ला विकलं, की कोणती फाईल होती माहित नाही. मुळात फुटीरतावादी आणि गद्दारांवर मला बोलायचंच नाही. तिथे गेलात,तिथे सुखी राहा, अशी टीप्पणी करत आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांचा समाचार घेतला.

तसंच ठाकरे बंडखोर आमदारांवर टीका करताना म्हणाले, थोडी लाज ठेवा, राजीनामे द्या आणिनिवडणुकीला सामोरे जा. शिवसेनेचा इतिहास आहे.ज्यांनी ज्यांनी बंड केलं ते कधीही टिकले नाहीत. फुटीरतावादी, गद्दार कसे असतात, हे आता कळलं. गुवाहाटी,झाडी,गोवा आणि मग सकाळी सहा वाजता सगळं ओके. स्वतःची राक्षसी महत्वकांक्षा बघून ही गद्दारी केली.

उद्धव ठाकरे जेव्हा सर्जरीमध्ये होते तेव्हा तुम्ही सोडून गेलात. तेव्हा तुम्ही आमदारांची जमवा जमव केली.राजकारणात चांगल्या लोकांना स्थान नसतं.ते त्यांनी दाखवून दिलं. बंडखोर आमदारांचा डान्सचा व्हिडीओ बघून मला किळस आला. राजकारण कमी केलं, हीच आमची चूक. आसाममध्ये पूर आलेला असताना हे मज्जा करत होते, असा घणाघात ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटावर केला आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

Hidden Gems Maharashtra : भंडारदऱ्याजवळ पाहा Top 7 ठिकाणं, पावसाळ्यातलंं अद्भूत दृश्य

'आयत्या बिळात नागोबा' या म्हणीचा अर्थ काय?

SCROLL FOR NEXT