Rain Alert: मुंबईत पुढचे दोन दिवस मुसळधार; १२ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट

महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांतील १३० गावांमध्ये अतिवृष्टी झाली आहे.
Rain
RainSaam tv
Published On

मुंबई: गेल्या चार दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पाऊस (Rain) सुरू झाला आहे. कोकणासह विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईतही मुसळधार पाऊस पडत आहे, आता पुढील दोन दिवसही मुंबईत ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. मुंबईत १२ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट असणार आहे.

पुढील दोन दिवस मुंबईत भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. शनिवारी मुंबईत 'रेड' अलर्ट जारी होता, पण फक्त २.२ मिमी पाऊस झाला. मात्र, पाऊस सुरूच होता. महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांतील १३० गावांमध्ये अतिवृष्टी झाली. विदर्भ आणि मराठवाड्यात येणाऱ्या या गावांमध्ये पावसानंतर पूरस्थिती निर्माण झाली असून, त्याचा फटका लोकांना बसला आहे.

Rain
शिंदे-फडणवीस 'स्थगिती सरकार' होणार का? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना सवाल

पूरग्रस्त गावांमधून जवळपास २०० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. गडचिरोली, हिंगोली आणि नांदेड हे तीन जिल्ह्यात गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसानंतर या ठिकाणी सर्वाधिक फटका बसला आहे. गुरुवारी, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) रेड किंवा ऑरेंज अलर्ट जारी असलेल्या दिवसांमध्ये समुद्रकिनाऱ्यांवर लोकांना प्रवेश करण्यास बंदी घालणारा आदेश जारी केला होता.

Rain
Maharashtra Rain Update: मेळघाटात मुसळधार पाऊस; ३५ वर्षीय युवक वाहून गेला, अनेक गावांचा संपर्क तुटला

ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर हा विशेष आदेश मुंबईत १२ जुलैपर्यंत लागू आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त, मान्सूनचा परिणाम दक्षिणेकडील तेलंगणा राज्यावर झाला आहे. येथे रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. हवामान खात्याने राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस १२ जुलैपर्यंत रेड अलर्ट जारी केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com