Aaditya Thackeray News Saam tv
महाराष्ट्र

Shiv Sena Dasara Melava : आदित्य ठाकरेंची तोफ दसरा मेळाव्यात पहिल्यांदाच धडाडणार, शब्दांचे बाण कुणावर सोडणार?

Aditya Thackeray Speech In Dasara Melava : आदित्य ठाकरे पहिल्यांदाच दसरा मेळाव्यात बोलणार आहेत. त्यांच्या भाषणाकडे राज्याचे लक्ष लागेलय.

Namdeo Kumbhar

Shiv Sena Dasara Melava 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही शिवसेनाचा होणाऱ्या दसरा मेळाव्यात शब्दास्त्रांचे शिलांगण होणार आहे. एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा आझाद मैदानात होत आहे, तर ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये होतोय. दोन्ही नेते काय बोलणार? याकडे राज्याचे लक्ष लागलेय.पण त्याआधीच पावसाने सुरुवात केली आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यावर पावसाचे सावट आलेय. पण आज होणाऱ्या दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरेंची तोफ धडाडणार असल्याचं वृत्त समोर आले आहे.

ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरे बोलण्याची ही पहिलीच वेळ असेल. आदित्य ठाकरे आपल्या शब्दाच्या बाणातून कुणावर निशाणा साधणार? याकडे शिवसेनेचं लक्ष लागले असेल.

आदित्य ठाकरे कुणावार सोडणार शब्दांचा बाण -

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचा दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात होणाऱ्या दसरा मेळाव्यात पहिल्यांदाच युनासेनाप्रमुख आदित्य ठाकरे भाषण करणार असल्याची माहीती समोर आली आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे पक्षाचे नेते देखील आहेत… त्यामुळे यावेळी त्यांना पहिल्यांदाच दसरा मेळाव्यात भाषण करण्याची संधी मिळतेय.

ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात कोण कोणत्या नेत्यांची भाषणं होणार?

भास्कर जाधव

सुषमा अंधारे

आदित्य ठाकरे

संजय राऊत

उद्धव ठाकरे

दसरा मेळाव्यावर पावसाचे सावट -

शुक्रावारी मुंबईमध्ये पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळे आझाद मैदान आणि शिवाजी पार्कवर पाणीच पाणी साठले. शिवाजी पार्कवर चिखल झाल्याचे फोटोही समोर आले होते. त्यातून मार्ग काढण्यासाठी शिवसेनेकडून उपाययोजना कऱण्यात येत होत्या. त्यातच आता पुन्हा एकदा मुंबईमध्ये पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे दसरा मेळाव्याला जमलेल्या शिवसैनिकांची तारांबळ उडाली. संध्याकाळी होणार्‍या दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून शिवसेनेचे कार्यकर्ते आले आहेत. पावसामुळे त्यांची तारांबळ होत असल्याचे चित्र आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : शेतात गेले ते परत आलेच नाहीत; आधी वडिलांनी स्वतःला संपवलं, त्यांना बघून मुलानंही मृत्यूला कवटाळलं

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sushil Kedia: मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल सुशील केडियांचं राज ठाकरेंना थेट आव्हान|VIDEO

Crime News : घरगुती वाद टोकाला गेला, निवृत अधिकाऱ्याने कुटुंबीयावर गोळ्या झाडल्या; मुलाचा जागीच मृत्यू

Maharashtra Politics : मराठी भाषा वादात हिंदूत्वाची एन्ट्री; गरीब हिंदूंना टार्गेट केलं जातंय, मंत्री नीतेश राणेंचा ठाकरे बंधूंवर प्रहार

SCROLL FOR NEXT