Maharashtra Politics : दसरा मेळाव्याआधीच मुंबईत राजकीय वातावरण तापलं; बॅनर फाडल्याने ठाकरे गट आक्रमक

Mumbai Politics : दसरा मेळाव्याआधीच मुंबईत राजकीय वातावरण तापलं आहे. मुंबईच्या जोगेश्वरीत बॅनर फाडल्याने ठाकरे गट आक्रमक झाला आहे.
दसरा मेळाव्याआधीच मुंबईत राजकीय वातावरण तापलं; बॅनर फाडल्याने ठाकरे गट आक्रमक
Maharashtra Politics :Saam tv
Published On

संजय गडदे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : मुंबई महापालिकेच्या के पूर्व प्रभाग कार्यालयातील प्रभाग क्रमांक 72 आणि 73 मधील विविध कामांचे कार्य आदेश निघाले आहेत. मात्र प्रत्यक्षात त्या ठिकाणी कामच झालं नसल्याचं म्हणत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. या भ्रष्टाचाराचा पोलखोल करणारे बॅनर ठाकरे गटाने रस्त्यावर लावले. आज याच प्रभागातील एका कार्यालयाचं उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. त्याआधीच हे बॅनर अज्ञातांनी फाडल्याने ठाकरे गट आक्रमक झाला आहे.

मुंबईतील के पूर्व प्रभागातील कार्यालयाच्या माध्यमातून ७२ आणि ७३ मध्ये विविध नागरी कामे मंजूर झाली आहेत. त्यासाठी कार्य आदेश देखील काढण्यात आले होते. तसेच लाखोंचा निधीही मंजूर झाला होता. मात्र, त्या ठिकाणी एकही रुपयांचं काम झालं नसल्याचा आरोप ठाकरे गटाच्या अमित पेडणेकर यांनी केला. याच विभागात मुख्यमंत्री शिंदे एका कार्यक्रमासाठी येणार आहेत. त्यामुळे हा भ्रष्टाचार मुख्यमंत्री शिंदे यांच्या लक्षात आणून देण्यासाठी ठाकरे गटाने मोठी बॅनरबाजी केली होती.

दसरा मेळाव्याआधीच मुंबईत राजकीय वातावरण तापलं; बॅनर फाडल्याने ठाकरे गट आक्रमक
New Mumbai : नवी मुंबई विमानतळावर 'सुखोई'चं पहिलं यशस्वी लॅंडींग; 'सुखोई'ला दिला ‘वॉटर सॅल्यूट’

जोगेश्वरी पूर्वेकडील आजगावकर डिस्पेन्सरीचे दुरुस्ती आणि संपूर्ण लादीकरण, शौचालय दुरुस्तीकरण आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वापरासाठी टेबल, खुर्च्या आणि तीन लोखंडी कपाटे देखील मंजूर करण्यात आली होती. मात्र यातील एकही काम प्रत्यक्षात झालेले नसताना ठेकेदाराला बिल मंजूर करण्यात आल्याचा आरोप पेडणेकर यांनी केला आहे. या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून याला जबाबदार सहाय्यक अभियंता प्रसाद धुमाळे हे असल्यामुळे त्यांनी या संदर्भात उत्तर द्यावे, अशी मागणी करणारे बॅनर ठाकरे गटाकडून मोठ्या प्रमाणावर लावण्यात आले होते.

दसरा मेळाव्याआधीच मुंबईत राजकीय वातावरण तापलं; बॅनर फाडल्याने ठाकरे गट आक्रमक
Dasara Melava 2024 : रुग्णालयातून डिस्चार्ज, जरांगे थेट मैदानात! आरक्षणासाठी घेणार दसरा मेळावा

आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या प्रभागातील पालिका कार्यालयाचे उद्घाटन होणार होते. मात्र, ते येण्यापूर्वी अज्ञातांनी हे बॅनर काढल्याचे समोर आले आहे. यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. यासंदर्भात आता त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पालिका अधिकाऱ्यांनी केलेल्या या भ्रष्टाचाराविरोधात वरिष्ठापर्यंत तक्रार करणार असल्याचे देखील पेडणेकर यांनी सांगितले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com