New Mumbai : नवी मुंबई विमानतळावर 'सुखोई'चं पहिलं यशस्वी लॅंडींग; 'सुखोई'ला दिला ‘वॉटर सॅल्यूट’

New Mumbai AirPort : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाची चाचणी यशस्वीपणे करण्यात आली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती ही चाचणी घेण्यात आली आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाची चाचणी यशस्वी झाली आहे. भारतीय हवाईदलाचे ‘सी 295’ विमान विमानतळावर लँण्डींग झाले आहे. विमानाने आकाशात सात ते आठ घिरट्या घातल्या. त्यानंतर नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर विमानाची यशस्वी लॅण्डींग झाले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्र्यांच्या उपस्थिती ही चाचणी घेण्यात आली. हे विमान धावपट्टीवर उतरताच त्याला ‘वॉटर सॅल्यूट’ करण्यात आले.

भारतीय हवाईदलाचे 'सी 295' विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँण्डींग झाले आहे. हे विमान धावपट्टीवर उतरताच त्याला 'वॉटर सॅल्यूट' करण्यात आले. ‘सी 295’ विमानानंतर सुखोई 30 विमानसुद्धा धावपट्टीवर उतरले. दरम्यान, या विमानतळावरुन मार्च २०२५ महिन्यात देशांतर्गत विमाने सुरु होणार असून आंतरराष्ट्रीय विमाने जून २०२५ पासून सुरु करण्याचा मानस सिडकोचे अध्यक्ष अन् आमदार संजय शिरसाट यांनी दिले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com