Raigad Politics Over Guardian Minister Aditi tatkare Bharat Gogawale Saam Tv
महाराष्ट्र

Raigad Politics : पालकमंत्रिपदावरुन आदिती तटकरेंचा भरत गोगावलेंना खोचक टोला; म्हणाल्या, ''पदाची इच्छा ठेवणे गैर नाही पण.."

Raigad Politics Over Guardian Minister : रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री घेतील असे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी भरत गोगावले यांना खोचक टोला देखील लगावला आहे.

Yash Shirke

सचिन पाटील, साम टीव्ही, प्रतिनिधी

Raigad Politics : रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन मागील काही दिवसांपासून वाद सुरु आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे भरत गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आदिती तटकरे यांच्यामध्ये रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन रस्सीखेच सुरु आहे. यामुळे महायुती सरकारमधील वाद उघडकीस आल्याचे म्हटले जात आहे.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुती सरकारने पालकमंत्रिपदांचाही विस्तार केला. तेव्हा रायगडचे पालकमंत्रिपद आदिती तटकरे यांच्याकडे सोपवण्यात आले. या निर्णयावर भरत गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांच्या समर्थकांनी सरकारच्या निर्णयाचा निषेध केला. प्रकरण अधिक चिघळत असल्याने महायुतीने रायगड पालकमंत्रिपदाबाबत घेतलेल्या निर्णयाला स्थगिती दिली.

या प्रकरणावर आदिती तटकरे यांनी भाष्य केले आहे. 'पालकमंत्रिपदाबाबतचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील आणि मग ज्याची त्याला जबाबदारी मिळेल', असे त्यांनी म्हटले आहे. पुढे 'पदाची इच्छा व्यक्त करणे काही गैर नाही. मात्र आपण राज्यातील कायदा व सुव्यवस्था चांगली कशी राहील याचे भान जपले पाहिजे. एक मंत्री म्हणून ही आपली जबाबदारी आहे' असे विधान करत त्यांनी भरत गोगावलेंना खोचक टोलाही लगावला.

रायगडच्या पालकमंत्रिपदी आदिती तटकरे यांची निवड झाल्यानंतर भरत गोगावले यांच्या समर्थकांनी जोरदार राडा केला होता. त्यांनी सरकारच्या निर्णयाच्या विरोधात आंदोलन पुकारले होते. त्यामुळे महायुती सरकारने पालकमंत्रिपदाविषयी पुनर्विचार करण्याचा निर्णय घेतला. या गोष्टीवरुन आदिती तटकरेंनी टोला लगावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT