Actor Govinda Instagram @govinda_herono1
महाराष्ट्र

Govinda Health Update : प्रचारसभेत असताना गोविंदाची तब्येत बिघडली, अर्धवट सभा सोडून घरी परतला

Govinda Health Update News : आज जळगावात अभिनेता गोविंदाची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे त्याने प्रचार अर्ध्यावर सोडून घरी परतला.

Vishal Gangurde

संजय महाजन, साम टीव्ही

जळगाव : विधानसभा निवडणुकीत सेलिब्रिटी मंडळी देखील आघाडीवर आहेत. सेलिब्रिटी मंडळी देखील उन्हातान्हात राजकीय पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसत आहेत. मागील लोकसभा निवडणुकीदरम्यान शिंदे गटात पक्षात प्रवेश केलेल्या गोविंदा देखील प्रचार करत आहेत. जळगावमधील पाचोरा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार किशोर पाटील यांच्या प्रचारासाठी अभिनेता गोविंदा आला होता. जळगावमध्ये आलेल्या गोविंदाची अचानक तब्येत बिघडली. त्यानंतर गोविंदाची तब्येत बिघडली.

गोविंदा म्हणाला, किशोर पाटील यांच्यासाठी शुभेच्छा देतो. ते एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहेत. देशात होणाऱ्या प्रगती सोबत आहेत. मी आईला प्रार्थना करतो की, किशोर पाटील विजयी होवो. माझी तब्येत ठिक नसल्याने मी येथून निघत आहे. मी येथील जनतेची क्षमा मागतो. येथील लोकांनी प्रेमाने माझी वाट बघितली आणि मी अर्ध्यातून जात आहे. माझी तब्येत ठिक नाही. मला गोळी लागलेली होती आणि आता सध्या छातीमध्ये दुखत आहे'.

'मी कुठलीही जोखीम न घेता येथून निघत आहे. किशोर पाटील विजयी झाल्यानंतर मी पुन्हा या ठिकाणी येईल. शिवसेना नेहमी आपला पुरुषार्थ घेऊन चालली आहे. महायुती नक्कीच विजय होईल. देशाला पुढे नेण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व सितारे पुढे आले आहे. महाराष्ट्रच्या भूमीची कृपा राहिली आहे. नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदेंमुळे महाराष्ट्राकडे बघायला सुरुवात केली नक्की ती प्रगती आहे, असा गोविंदा पुढे म्हणाला.

'मी त्या शिवसेनेला देखील माझे सेवा दिलेली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या सिनेमांमध्ये हिरो राहिलो आहे. मी 'हसीना मान जाएगी'मध्ये हिरो राहिलो आहे. मी शिवसेनेसोबत जोडलेला आहे. आता मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे, असेही त्याने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

SCROLL FOR NEXT