Raj Thackeray News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमधून उद्धव ठाकरेंवर टीका केली. महाविकास आघाडी स्थापनेवरून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. मी उद्वव ठाकरे यांच्या जागी असतो तर मी मुख्यमंत्रिपद घेतलं नसतंस, असं म्हणत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं.
नाशिकमधील विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारसभा आयोजित केली होती. या प्रचारसभेत राज ठाकरे म्हणाले, 'मी लोकसभेत पाच गोष्टी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितल्या. त्या माझ्या हिताच्या नव्हत्या. मी मागील वेळी मराठी भाषाला अभिजात दर्जा देण्याची मागणी केली होती. तो दर्जा मिळवून दिल्याबद्दल त्यांचे आभार. यामुळे कधी कधी ऊर भरून येतो. कधीतरी विचारू करून बघा. छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ज्योतीराव फुले जी भाषा बोलते होते, ती भाषा आपण बोलतो. त्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे'.
'२०१९ साली उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो तर म्हटलं असतं की, मी तुमच्या बरोबर येतो. पण मी सांगेन त्या गोष्टी राज्यात झाल्या पाहिजे. त्यातील अनेक गोष्टीत आहेत. मुंबई-नाशिकच्या रस्ताचा त्यात समावेश आहे. आज पुण्यात इतके उद्योग आले. त्यामुळे रस्ते चांगले झाले. नाशिकमधील या मतदारसंघाला उद्योगनगरी म्हणतात. कारण इतके उद्योग मतदारसंघात आहेत. त्यातील काही उद्योग बंद झाले. यामुळे अनेक लोक बेरोजगार झाले. उद्योग जिल्ह्यात येण्यासाठी तसं सभोवती वातावरण लागतं, असे राज ठाकरे म्हणाले.
'महिंद्रा कंपनी येथे होती. त्यांना उद्योग विस्तार करायचा होता. त्यांनी एक स्कॉर्पियो नावाची कार काढली. मात्र, सरकारी हस्तक्षेप, सरकारी त्रास याला महिंद्रा कंटाळले होते. माझे ते मित्र आहेत. एकेदिवशी कळाले की, ते कंटाळून चेन्नईला चालले आहेत. त्यांना तामिळनाडूत सुखसोई मिळतात, त्यामुळे तिकडे चालले आहेत. हे कळल्यावर मी आनंद महिंद्र यांना भेटलो. त्यात नाशिकचेही काही जण होते, असे ठाकरे पुढे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.