महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साम टीव्हीवरील 'ब्लॅक अँड व्हाइट' या एक्स्क्लुझिव्ह कार्यक्रमात सकाळ माध्यम समूहाचे संपादक नीलेश खरे यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. मुख्यमंत्रिपद ते भविष्यात भाजपसोबत युती आणि शिंदेसेना, राज ठाकरेंसोबत एकत्र येण्यासंदर्भातील चर्चा ते व्होट जिहादसंदर्भात विचारलेल्या बेधडक प्रश्नांना उद्धव ठाकरे यांनी रोखठोक उत्तरे दिली.
राजकारण हे वाईट क्षेत्र असल्याचं म्हटलं जातं,परंतु हे क्षेत्र वाईट नाहीये. यातून समाजाची सेवा केली जाते. क्षेत्र वाईट नसतं, पण त्या क्षेत्रातील लोक वाईट असतात. भारतीय जनता पक्षाने गेल्या काही वर्षात महाराष्ट्राची संस्कृती लयास नेलीय, भाजपला सर्व ग्राम पंचायत ते लोकसभा निवडणुकीत सत्ता हवी असते. मते नाही मिळाली तर भाजप इतर पक्षातील मतं फोडतात. इतर पक्ष फोडतात.जेणेकरून सत्ता आपल्यालाच मिळेल असा भाजपचा स्वभाव आहे, त्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती लयास गेल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.
महाराष्ट्राची संस्कृती ही कमकूवत नाहीये. ज्या-ज्या वेळी महाराष्ट्राची संस्कृतीवर आघात झालाय. त्या- त्यावेळी महाराष्ट्रातील जनतेने आक्रमण करणाऱ्यांना फोडलंय. यावेळीही संस्कृतीवर आघात करणाऱ्यांना जनता फोडून काढेल, असंही ठाकरे म्हणालेत.
या प्रश्नावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, माझं सरकार पाडणं हा नक्कीच सत्ता जिहादचा भाग होता.माझ्या पक्षातील माणसांवर धाडी टाकणं, आयुष्य उद्धवस्त करणं,कुटुंबाची बदनामी करणं यामुळे बहुतेक जण जीव देण्याच्या तयारीत असतात, मग त्यांना भाजप आपल्या पक्षात घेते.मग त्यांना धुवून पुसून पुढे आणायचं हा सत्ता जिहादच आहे.
हो, गुजरातमधून महाराष्ट्रातील सत्ता जिहादाला आर्थिक पाठबळ होतं. हे आर्थिक पाठबळ महाराष्ट्र लुटण्यासाठी होतं. यामुळे संस्कृती नाही तर महाराष्ट्राच्या आर्थिक व्यवस्थेवर सुद्धा हल्ला आहे. मुंबई आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे,पण आता मुंबई अहमदाबादला नेली जात आहे. मुंबईतील आणि महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेले जात आहेत. मी मुख्यमंत्री असताना जे साडेसहा लाख रुपयांचे सांमजस्य करार करण्यात आले होते, तेही तोडून मोडून सर्व उद्योग हे गुजरात नेले आहेत, हा महाराष्ट्रावरती मोठा दरोडा आहे.
मुंबईतील उद्योगपती गौतम अदानी यांनी सरकार पाडण्यात मदत केलीय. यावर शरद पवार स्पष्टपणे बोलले आहेत.धारावी प्रकल्पातून हजरो कोटी रुपयांची जमीन ही अदानी यांच्या घशात घातली जात आहे. हे प्रकरण आम्ही समोर आणणार आहोत. अंबुजा सिमेंटच नाव बदलून ते आता अदानी सिमेंट झालं आणि त्याचं मुख्यालय अहमदाबाद येथे नेण्यात आलं.टाटा एअर बसचा प्रकल्प आम्ही वर्ध्यात आणणार होतो, तेही गुजरात येथे नेण्यात आला.मेडिकल डिव्हाइस पार्क छत्रपती संभाजीनगरला आणणार होतो.यातून राज्यातील एक लाख लोकांना रोजगार मिळाला असता.
जाऊ द्या,हे सर्व लोकांनी पाहिलंय. सांभाळता आली नाहीत ते काही लहान बाळ होती.त्यांना सगळं दिलं होतं,त्यांना सर्व देत होतो.सत्तेची दूध पिऊन हे सर्व टवटवीत झालेत,आणि मग ठग्यासारखे ते गुजरातला ढोकळा खायला पळून गेलेत.तर त्यांना काय सांभाळायचं.
माहीमच्या जागेवरून ठाकरे कुटुंबातील मुलगा निवडणूक लढवतोय. यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र यावे, असं काही लोकांना वाटत आहे. पण काहीजण या दोघांमध्ये दुरावा निर्माण करत आहेत, त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले,त्याविषयी काय माहिती नाही.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याचा प्रस्ताव आपल्याकडे आला होता, असा प्रश्न उद्धव ठाकरेंना केला गेला. त्यावर ठाकरे म्हणाले या प्रश्नात काही रस नाहीये.आज मी प्रचारासाठी महाराष्ट्रात फिरतोय. कपासाला, सोयाबीनला योग्य दर नाही. बेरोजगारांना नोकरी नाहीये. शेतकरी आत्महत्या करताहेत.
या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी मागतोय, मला काय मिळणार याची उत्तरे मागतोय. तुमचं घरगुती काय असेल ते तुमचं तुम्ही बघा. माझं घर चालत नाहीये. मुलांना शिक्षण मिळत नाहीये.फी भरायला पैसे नाहीत म्हणून मुलं शाळेत जाऊ शकत नाहीत. हे विषय निवडणुकीचे विषय आहेत.
लाडकी बहीण योजना ही बंद करण्यात आलीय. बाकीच्या योजना चालू आहेत, पण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद करण्यात आलीय. ही योजना निवडणूक आयोगाच्या माध्यमातून बंद करण्यात आलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.