भरत मोहोळकर, साम टीव्ही प्रतिनिधी
मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदाकडून मिसफायरिंग झाल्याने पायात गोळी घुसल्याची धक्कादायक घटना घडली होती. यानंतर गोविंदावर शस्त्रक्रिया करून पायातून गोळी काढण्यात आली. सध्या गोविंदाची प्रकृती स्थिर आहे. मात्र पोलिसांनी घेतलेल्या जबाबातील माहितीमुळे पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचुकलीय. त्यामुळे या प्रकरणाला वेगळंच वळण मिळण्याची शक्यता निर्माण झालीय.
गोविंदा कोलकात्याला जाण्यासाठी तयारी करत होता. रिव्हॉल्वर कपाटात ठेवताना हातातून पडली आणि मिसफायर झाल्याने गोळी पायात घुसल्याचा दावा गोविंदाने केला आहे.
गोविंदा, त्याचा मॅनेजर आणि पत्नी व मुलीने जबाब नोंदवल्यानंतरही पोलिसांच्या मनातून संशय काही जायला तयार नाही. त्याचं नेमकं कारण काय? पाहूयात...
पिस्तुल साफ करताना गोळी सुटू शकते. मात्र ती वरच्या दिशेने कशी फायर झाली? रिव्हॉल्वर हातात असतानाच गोळी सुटली का? गोविंदा काहीतरी लपवत असल्याना पोलिसांना संशय आहे.
गोविंदाची प्रकृती सध्या स्थिर असून 2 ते 3 दिवसात डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती गोविंदाची पत्नी सुनीता आहुजांनी दिलीय.
गोविंदा बाहेर जाण्यापूर्वी त्याने रिव्हॉल्वरमध्ये गोळ्या का भरल्या? त्याने पिस्तुलात सर्वच गोळ्या का टाकल्या? असे अनेक प्रश्न निर्माण झालेत. त्यामुळे पोलिस पुन्हा गोविंदाचा जबाब नोंदवणार आहेत. त्यामुळे गोविंदाच्या जबाबातून आणि बॅलेस्टिक अहवालातून गोविंदा काही लपवतोय की काय? हे स्पष्ट होणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.