buldhana, grampanchyat saam tv
महाराष्ट्र

Grampanchayat : जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने 23 ग्रामपंचायत सदस्य अपात्र

या निर्णयामुळे ग्रामपंचायत सदस्यांच्या समर्थकांमध्ये खळबळ उडाली आहे.

संजय जाधव

Buldhana News : जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने बुलढाणा (buldhana) जिल्ह्यातील तेवीस ग्रामपंचायत (grampanchayat) सदस्यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. हा निर्णय जिल्हाधिकारी एच. पी. तुम्मोड यांनी दिला आहे. यामुळे संबंधित ग्रामपंचायतीत एकच खळबळ उडाली आहे.

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका (election) झाल्या. राखीव जागांवर ज्या ग्रामपंचायत सदस्यांनी निवडणुका लढल्या आणि निवडून आले त्यांना एक वर्षाच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत देण्यात आली होती. विशेष म्हणजे ग्रामविकास विभागाने दहा मे 2022 रोजी परिपत्रक काढून वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत वाढ 17 जानेवारी 2023 पर्यंत केली होती.

परंतु एवढा कालावधी मिळून सुद्धा सदस्यांनी त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी एचपी तूमोड यांनी सदस्यांना अपात्र घाेषित केले आहे. जात वैधता प्रमाणपत्र साधारण करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांना महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्रमांक ग्रामपंचायत (/ 2014 / प्र. क्र. 159 / पं. रा. -2 दिनांक 4 ऑगस्ट 2016) नुसार अपात्र घोषित केले आहे.

यात मोताळा तालुक्यातील जवळपास 23 ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश आहे. यात काही सदस्य सरपंच सुद्धा आहेत. एकाच ग्रामपंचायतीचे तीन-तीन सदस्य सुद्धा यात अपात्र करण्यात आले आहेत.

मोताळा तालुक्यातील अपात्र सदस्य

श्रीमती वंदना तानाजी जाधव ग्रामपंचायत घुसर बुद्रुक

मुकेश परमसिंग पवार ग्रामपंचायत धामणगाव देशमुख

अनुसयाबाई धनराज धाबे ग्रामपंचायत धामणगाव देशमुख

तहारे गांगु ईश्वरसिंग ग्रामपंचायत इब्राहिमपूर

विलास भागचंद मंझा ग्रामपंचायत कुऱ्हा

बबीता शेन्सिंग पेळे ग्रामपंचायत कुऱ्हा

काशीराम शेजराम मंझा ग्रामपंचायत कुऱ्हा

वर्षाबाई संदीप घोती ग्रामपंचायत कुऱ्हा. (Maharashtra News)

बबीता जगन्नाथ साबळे ग्रामपंचायत कुऱ्हा

सुमन नारायण बर्डे ग्रामपंचायत मोहेगाव

नटवरलाल सुंदरलाल जाधव ग्रामपंचायत पिंपळगाव नाथ

सरस्वती दयाराम नाईक ग्रामपंचायत पिंपळगाव नाथ

रेखा भास्कर गायकवाड ग्रामपंचायत शेलापुर खुर्द

पुष्‍पाबाई आनंदा उमाळे ग्रामपंचायत शिरवा

दिनेश भिका घोती ग्रामपंचायत तरोडा

अनुप सिंग देव सिंग येरवाळ ग्रामपंचायत तरोडा

सुषमा रामनाथ कटारे ग्रामपंचायत तरोडा

अनिता दीवालसिंग धीरबस्सी ग्रामपंचायत तरोडा

धरासिंग रावसिंग मंझा ग्रामपंचायत तरोडा

शिल्पा विकास बस्सी ग्रामपंचायत तरोडा

एकनाथ जोरसिंग जाधव ग्रामपंचायत तरोडा

आशा रमेश जाधव ग्रामपंचायत तरोडा

अन्नपूर्णा महादेव जुनारे ग्रामपंचायत वरूड

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निवडणूक आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर एक्साईज विभागाची धडक कारवाई, ७० लाखांचा बेकायदेशीर दारू साठा जप्त

Vitamin B12: हाता-पायाला सतत मुंग्या येतात? असू शकते 'या' व्हिटॅमिनची कमतरता, आताच करा आहारात 'हा' बदल

Ankita Walawalkar: 'स्पायवर मस्करी करून रिल बनवणं...'; अंकिता वालावलकर धुरंधरच्या 'त्या' ट्रेंडवर संतापली, म्हणाली...

Mithila Palkar: हिरवी चोळी अन् दिसायला गोरी;मिथिलाचं नवं रुप प्रेमात पडाल

Manikrao Kokate : मोठी बातमी! मंत्री माणिकराव कोकाटेंना अटक होणार, वॉरंट निघाले

SCROLL FOR NEXT