radhakrishna vikhe patil , balasaheb thorat, karad
radhakrishna vikhe patil , balasaheb thorat, karadsaam tv

Radhakrishna Vikhe Patil : बाळासाहेब थाेरातांच्या 'त्या' भिमगर्जनेवर विखे-पाटलांची बाेचरी टीका

सत्यजित तांबे यांच्या विजयात भाजपचा वाटा आहे हे त्यांनीही मान्य केले आहे.
Published on

Radhakrishna Vikhe Patil On Balasaheb Thorat : नाशिक पदवधीर मतदारसंघातील विजयाबाबत (Nashik Graduate Constituency Election Result) आपल्याला काय वाटतं, बाळासाहेब थाेरात (Balasaheb Thorat) यांच्याबाबत काय या प्रश्नावर भाजप नेते राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी खिंड लढविणारे पळून गेले अशी प्रतिक्रिया दिली. विखे-पाटील आज कराडात (karad Latest News) एका कार्यक्रमासाठी आले हाेते. त्यापुर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

radhakrishna vikhe patil , balasaheb thorat, karad
Pune Bangalore National Highway : कराड - मलकापूर उड्डाणपूल पाडणार; जाणून घ्या वाहतुक मार्गातील बदल

मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले मी भाजपात प्रवेश केला. त्यावेळी बाळासाहेब थोरात यांनी बाजीप्रभु देशपांडे यांच्यासारखा मी एकटा खिंड लढवणार आहे अशी भिमगर्जना केली हाेती. परंतु त्यांनी खिंड सोडुन पळ काढला हे सर्वांनीच पाहिले अशी टीका विखे-पाटलांनी थाेरात यांच्यावर केली.

radhakrishna vikhe patil , balasaheb thorat, karad
Satara News : पुण्याची सात फेटेवाला, साता-याची चॅटींग; नट-खट राज्य बाल एकांकिका स्पर्धेत यश

बाळासाहेब थाेरात यांनी भाजप पक्षात प्रवेश केला तर तुम्ही स्विकारणार का ? या प्रश्नावर विखे पाटील म्हणाले माझा काही संबंध येत नाही. पक्ष नेतृत्व ठरवेल त्यांच्या बाबत. बाळासाहेब पक्षात आले तर पक्ष नेतृत्व सांगेल तसे आम्ही करु असेही विखे-पाटील यांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com