Satara News: सातारा पालिका (satara muncipal council) आणि कल्याणी ग्रुप यांच्यावतीने आयाेजिलेल्या राज्यस्तरीय नट-खट बाल एकांकिका स्पर्धेत (Nat-Khat Bal Ekankika Spardha) पुण्यातील (pune) क ख ग संस्थेच्या सात फेटेवाला (saat phetewala) या बाल एकांकिकाने प्रथम क्रमांक पटकाविला.
स्पर्धेत साता-यातील रसिक कला मंचच्या चॅटिंगने (chatting) द्वितीय तसेच कोल्हापूरच्या (kolhapur) अलंकार कला अकादमीने तृतीय क्रमांक मिळविला. या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये मुंबई (mumbai), पनवेल (panvel), रत्नागिरी (ratnagiri), पुणे, इचलकरंजी (ichalkaranji), कोल्हापूर, सातारा येथील संघ सहभागी झाले हाेते.
लहान मुलांना त्यांची कला सादर करण्यासाठी तसेच नाट्यचळवळीतील पुढील पिढी तयार व्हावी हा उद्देश समोर ठेवून या स्पर्धेचे संयोजन करण्यात आले होते. सहभागी सर्वच संघानी अतिशय नावीन्यपूर्ण, वैविध्यपूर्ण विषयांना हात घालून आपल्या एकांकिका सादर केल्या.
लहान लहान बालके निरागसपणे परंतु तितक्याच ताकतीने आपली भूमिका वठवत एकांकिका सादर करत होते. सर्वच संघातील या लहान कलाकारांनी आपल्या सादरीकरणाने सातारकर आणि उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आणि आम्हीच भविष्यातील नाट्यचळवळीचे आधारस्तंभ आहोत हे दाखवून दिले.
स्पर्धेचे उदघाटन सातारा पालिकेचे अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले, सामाजिक कार्यकर्ते वसंत जोशी, हेरंब जोशी, क्रीडा संघटक इर्शाद बागवान यांच्या उपस्थितीत तसेच पारितोषिक वितरण समारंभ उद्योजक दत्ताजी थोरात, सातारा कारागृहाचे सुप्रिटेंड शामकांत शेडगे, माजी नगरसेवक सागर पावशे, राजेश मोरे, संयोजन कमिटीचे प्रमुख कल्याण राक्षे तसेच साताऱ्यांतील सर्व रंगकर्मी उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षक म्हणून वर्षा चौगुले आणि चंद्रकांत कांबीरे यांनी काम पाहिले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल असा
1) रंगभूषा आणि वेशभूषा
प्रथम क्रमांक - क ख ग पुणे (सात फेटेवाला)
द्वितीय क्रमांक - रंगरचना कला मंच पनवेल (मी श्री. छ. शिवाजी महाराज होणार)
2) पार्श्वसंगीत
प्रथम क्रमांक- बाराखडी नाट्यमंडळी सातारा (या चिमण्यांनो परत फिरा रे )
द्वितीय क्रमांक - क ख ग पुणे (सात फेटेवाला)
3) नेपथ्य
प्रथम क्रमांक - श्री बालाजी विद्यामंदिर इचलकरंजी (थेंब थेंब श्वास )
द्वितीय क्रमांक - क ख ग पुणे (सात फेटेवाला) (Maharashtra News)
4) प्रकाश योजना -
प्रथम क्रमांक - बाराखडी नाट्यमंडळी सातारा (या चिमण्यांनो परत फिरा रे )
द्वितीय क्रमांक - श्री बालाजी विद्यामंदिर इचलकरंजी ( थेंब थेंब श्वास)
5) सर्वोत्कृष्ट अभिनय स्त्री
प्रथम क्रमांक - स्पृहा इनामदार (रसिक कला मंच सातारा )
द्वितीय क्रमांक - शर्वरी धडवई ( बाराखडी नाट्यमंडळी सातारा)
तृतीय क्रमांक - अंतरा पाटील (ट्री थिएटर अकादमी पुणे )
उत्तेजनार्थ - सान्वी यादव, ज्ञाणेश्वरी कुरकुरे, गार्गी हंगेकर, सान्वी दाते, अनुष्का कदम, रिरोमा रोडे, शांभवी प्रभुणे, ऋतुजा इंगळे, तन्वी मगर, संयोगिता चौधरी, श्रीमयी सावंत, तनिष्का साकत.
6) सर्वोत्कृष्ट पुरुष अभिनय
प्रथम क्रमांक - अर्णव कुलकर्णी (क ख ग पुणे )
द्वितीय क्रमांक - कुणाल गौड ( श्री बालाजी माध्यमिक विद्यालय इचलकरंजी)
तृतीय क्रमांक - रियांश माळी ( बालगड रंगभूमी पुणे )
उत्तेजनार्थ - सोहम जाधव, ओम मिचकर, पृथ्वीराज धोत्रे, आयुष धुमाळ, आर्य लोखंडे, देवदत्त घोणे, यशोधन सावंत, निल सुर्वे, ओम घंटी, गौरव खोराडे, सिद्धान्त नगरकर, साईराज घोडेचोर.
7) दिग्दर्शन
प्रथम क्रमांक - संतोष माकुडे (क ख ग पुणे)
द्वितीय क्रमांक - युवराज केळुसकर (अलंकार कलाकादमी फाउंडेशन कोल्हापूर)
8) सर्वोत्कृष्ट सांघिक एकांकिका
प्रथम क्रमांक - सात फेटेवाला (क ख ग पुणे)
द्वितीय क्रमांक - चॅटिंग (रसिक कला मंच सातारा )
तृतीय क्रमांक - (अलंकार कलाकादमी फाउंडेशन कोल्हापूर)
उत्तेजनार्थ प्रथम - या चिमण्यांना परत फिरा रे ( बाराखडी नाट्यमंडळी सातारा )
उत्तेजनार्थ द्वितीय - मी श्री. छ. शिवाजी महाराज होणार (रंगरचना कला मंडळ पनवेल)
उत्तेजनार्थ तृतीय - सखी ( ट्री थिएटर अकॅडमी पुणे) (Breaking Marathi News)
यावेळी मान्यवरांच्या हस्ते सर्व संघाना सहभाग प्रमाणपत्र. विजेत्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमास साताऱ्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, जेष्ठ नाट्यप्रेमी, सहभागी संघ, स्पर्धक, नाट्यरसिक प्रेक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.