Shivendraraje Bhosale, Satara News
Shivendraraje Bhosale, Satara Newssaam tv

Shivendraraje Bhosale News: काेयता हल्ला, गाेळीबार प्रकरणानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी व्यक्त केली 'ही' भीती

परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये असे राजेंने नमूद केले.
Published on

Satara News : सातारा शहरात क्राईम वाढत आहे. काेयता घेऊन दहशत पसरविणे, गाेळीबार सारख्या घटना घडत आहेत. त्यामुळे सातारा पाेलिस दलाने गुन्हेगारी माेडीत काढण्यासाठी कडक आणि ठाेस पावले उचलावीत असे आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले (Shivendraraje Bhosale) यांनी नमूद केले. केवळ साताराच नव्हे तर जिल्ह्यातील गुन्हेगारांना वचक बसला पाहिजे अशी कृती पाेलिस (police) दलाने करावी ही अपेक्षा राजेंनी व्यक्त केली आहे.

Shivendraraje Bhosale, Satara News
Nilesh Rane : गाेट्या सावंतांचा जीव गेला असता, वैभव नाईक पळपुटा आमदार; कणकवलीतील राड्यावर निलेश राणेंचा धक्कादायक दावा

सातारा शहरात गणेशाेत्सव, नवरात्राेत्सव कालावधीत तसेच गेल्या महिन्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. युवा वर्ग भांडण, मारामारी, खंडणी सारख्या प्रकाराकडे आकर्षित हाेत असल्याचे चित्र आहे. गेल्या दाेन दिवसांत सातारा (satara) शहरात काेयत्याने मारहाण करणे, गाेळीबार सारखे प्रकार घडले आहेत. (Maharashtra News)

Shivendraraje Bhosale, Satara News
Satara News : फळकूट दादांना पाेलिसांनी चाेपले, काेयत्याचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी

याबाबत आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले म्हणाले काही वर्षांपुर्वी प्रतापसिंहनगर येथील गुंड दत्ता जाधव याच्यामुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये कमालीची दहशत पसरली हाेती. त्याचा पाेलिसांनी नंतर बंदाेबस्त केला. तशाच प्रकारची कारवाई पाेलिस दलाने करणे आवश्यक बनले आहे. सर्वसामान्य जनतेला हाेणारा त्रास थांबण्यासाठी पाेलिसांनी कठाेर भुमिका घ्यावी. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते अशी भिती राजेंनी व्यक्त केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com